Narendra Modi Nashik Tour : नरेंद्र मोदींनी नाशिकमधूनच लोकसभा लढवावी; महंतांची इच्छा पंतप्रधान स्वीकारतील ?

Narendra Modi Lok Sabha from Nashik : देव-धर्माबाबत चुकीच्या टीका करणाऱ्या शिक्षा करण्यासाठी कायदा आणावा..
Narendra Modi Nashik Tour :
Narendra Modi Nashik Tour :Sarkarnama
Published on
Updated on

अरविंद जाधव -

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवावी आणि काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर नाशिकचा विकास करावा, अशी मागणी श्रीकाळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी केली आहे. यामुळे आता राम मंदिर पुजारी आणि महंत सुधीरदास महाराज यांच्या विनंतीचा मान राखत मोदी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

Narendra Modi Nashik Tour :
Nashik BJP Vs NCP : नाशिकच्या देवळाली मतदारसंघावरून अजित पवार गट Vs भाजपमध्ये संघर्ष

राष्ट्रीय युवा अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी नाशिक शहरात दाखल होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. शहरासह जिल्ह्यातील भाजपाविरोधी वातावरण यामुळे दूर होण्याची अपेक्षा भाजपाच्या राज्यातील नेत्यांना आहे. दुसरीकडे काशीचे रूपडे बदलून काशीला जागतिक पर्यटनाच्या यादीत भक्कम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींकडून हिंदुत्ववादी संघटनांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी लोकसभा निवडणूक नाशिकमधूनच लढवावी, अशी मागणीच काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. (Latest Political News)

Narendra Modi Nashik Tour :
BHANDARA ZP NEWS : भाजप, राष्ट्रवादीच्या सदस्यांना निधी कमी का ? सर्वसाधारण सभेत पुन्हा खडाजंगी

याबाबत बोलताना सुधीरदास महाराज यांनी सांगितले की, "विकास म्हणजे विकासाची गॅरंटी. मोदींनी अनेक क्षेत्रात कामे केलीत. मात्र हिंदू धर्मीयांच्या दबलेल्या चेतनांना मोकळी वाट करून दिली. राम मंदिराचे निर्माण, काशीतील कॉरिडॉर यामुळे आपण हिंदुस्थानात आहोत, अशी भावना हिंदूमध्ये निर्माण झाली. काशी कॅरिडॉर महत्त्वपूर्ण आहे. यामुळे स्थानिक भागाचा विकास होऊन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यात. नाशिकमध्येही काशीप्रमाणे कॅरिडॉर राबवणे आवश्यक आहे. नाशिकची तीर्थस्थळे देशाच्या नव्हे तर जागतिक पर्यटनांचे आकर्षण केंद्र आहे."

"दरवर्षी लाखो पर्यटक नाशिक जिल्ह्यात दाखल होतात. त्यामुळे प्राचिन व धार्मिक नाशिकचा कायापालट कररण्यासाठी मोदींनी ही निवडणूक नाशिकमधूनच लढवावी, अशी मागणी मोदी यांच्याकडे करणार असल्याचे महंतांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी १२ जानेवारी रोजी गोदाआरती करतील. त्यानंतर ते २५ मिनीटे काळाराम मंदिरात पुजा आणि आरती करतील. इशनिंदा कायदाही महत्वाचा आहे. देव आणि धर्माबाबत होणाऱ्या चुकीच्या टीकेला आळा घालण्यासाठी हा कायदा पारीत व्हावा, यासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करणार असल्याचे महंत सुधीरदास महाराज यांनी स्पष्ट केले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com