PM Narendra Modi: लखपती दीदी मेळाव्यात पंतप्रधान मोदी 'बदलापूर'चा उल्लेख करतील का?

PM Narendra Modi Politics, Prime Minister will address 1.50 lakh womens gathering, will mention Badlapur?-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या जळगाव दौऱ्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत जळगाव येथे महिला मेळावा होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान या दौऱ्यात कोणती नवी घोषणा करणार, याची उत्सुकता आहे.

राज्य शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेचा जोरदार प्रचार, प्रसार सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही योजना महायुती सरकारला तारणार असा विश्वास सरकारला वाटतो.

या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव येथे दीड लाख महिलांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याl पंतप्रधान मोदी काय संदेश देणार? याची उत्सुकता आहे. विशेषतः जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनाही अपेक्षा आहेत.

नुकत्याच घडलेल्या बदलापूर शालेय विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणावरून राज्यात राजकारण तापलेले आहे. विरोधी पक्षाकडून विशेषतः महाविकास आघाडी कडून भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करण्यात आले आहे. राज्य शासनावर विविध आरोप होत आहेत.

Prime Minister Narendra Modi
Badlapur Rape Case : संवेदनशील घटनेच्या निषेध आंदोलनातही एकी नाही

या प्रकरणाने लाडकी बहीण योजनेचे मायलेज प्रभावित झाले आहे. राजकीय दृष्ट्या राज्य शासन बॅकफूटवर गेल्यासारखे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा दौरा आहे. लखपती दीदी या कार्यक्रमात लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त काही महत्त्वकांक्षी योजना राज्य शासनाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जळगावला आले नव्हते. त्या निवडणुकीत केळी उत्पादकांचे प्रश्न प्रामुख्यामे चर्चेत होते.

किसान रेल्वे रॅकला वाहतुकीच्या दरात अनुदान, बनाना क्लस्टर योजनेसाठी पायाभूत सुविधा आणि केळी उत्पादक असलेल्या रावेर यावल मुक्ताईनगर चोपडा आणि बोदवड या पाच तालुक्यांसाठी मेगा रिचार्ज योजना जाहीर करण्यात आली आहे.

Prime Minister Narendra Modi
Eknath Khadse News : एकनाथ खडसे 'या' कारणामुळे जाणार नाहीत जळगावमधील पीएम मोदींच्या कार्यक्रमास

भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे घोषित केले आहे. या प्रकल्पासाठी डीपीआर तयार आहे. त्याला दहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे पंतप्रधान आणि केंद्रीय कृषिमंत्र्यांनी त्यात लक्ष घातले तरच हा प्रकल्प पुढे सरकू शकतो.

जळगावचे राजकारण केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रभावाखाली असते. त्या दृष्टीने केळी उत्पादकांना पंतप्रधानांच्या आजच्या दौऱ्यात या संदर्भातील घोषणा अपेक्षित आहे. पंतप्रधान जळगाव साठी महत्त्वाच्या असलेल्या या योजनांबाबत काय बोलतात? याची उत्सुकता आहे.

या मेळाव्यात बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी रान उठविले आहे. त्यामुळे महिला सुरक्षा यासंदर्भात पंतप्रधान काही उल्लेख करतात की, नेहमीसारखे अनुलेखाने विरोधकांना उपेक्षित ठेवतात याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com