Nashik Crime : भाजप नेते सुनिल बागुलांचे तीनही पुतणे अखेर 'कायद्याच्या बालेकिल्ल्यात', पोलिसांनी दाखवला खाक्या

BJP leader Sunil Bagul’s nephew Ajay Bagul arrested : सुनिल बागुल यांनी पुतण्या अजय बागुल याला वाचविण्यासाठी मुंबईत ठाण मांडले होते असे सांगण्यात येते. अखेर पोलिसांनी त्यालाही अटक केली.
Ajay Bagul arrested
Ajay Bagul arrestedSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकच्या विसे मळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अजय बागुल टोळीतील ७ संशयितांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणात भाजपचे पदाधिकारी सुनिल बागुल यांच्या दोन पुतण्यांना या आधीच पोलिसांनी अटक केली होती. मात्र तिसरा मुख्य सूत्रधार असलेला अजय बागुल हा फरार होता, त्याच्या बचावासाठी सुनिल बागूल हे मुंबईत ठाण मांडून असल्याची चर्चा होती. पोलिसांनी आता त्यालाही अटक केली आहे.

सुनिल बागुल यांचे पुतणे गौरव बागुल व सागर बागुल यांना अटक केल्यानंतर पोलिस तिसरा पुतण्या अजयच्या शोधात होते. शनिवारी रात्री उशीरा पोलिसांनी एमपीमधून अजय बागूल याच्यासह सचिन कुमावत, पप्पू जाधव यांना ताब्यात घेतले. त्यामुळे सुनील बागुल यांचे तीन्ही पुतणे आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. अजय बागुलसह गौरव बागुल, सागर बागुल, संदेश शेळके, प्रेमकुमार काळे, वैभव काळे, मामा राजवाडे, अमोल पाटील हे सात संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचीही पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करुन सोडून दिले.

नाशिक पोलिसांनी रविवारी अजय बागुल , दिपक उर्फ पप्या जाधव, सचिन कुमावत यांना देखील पोलिस खाक्या दाखवला. न्यायालयात घेऊन जाताना नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे वाक्य त्यांच्याकडून वदवून घेण्यात आलं. वरील सर्व संशयित व सातपूर येथील हॉटेलमध्ये झालेला गोळीबार व खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या लोंढे टोळीकडूनही पोलिसांनी हे वाक्य वदवून घेतलं होतं.

Ajay Bagul arrested
Girish Mahajan : डोनाल्ड ट्रम्प अन् दादा भुसेंचे घनिष्ट संबंध, गिरीश महाजनांनी हसत हसत चिमटा काढला

धक्कादायक म्हणजे बागुल टोळीने विसे मळ्यात सचिन सांळुके याच्यावर केलेला गोळीबार व सातपूरला लोंढे टोळीकडून हॉटेलात केलेला गोळीबार दोन्ही गुन्हे संघटितपणे केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. लोंढे टोळीचे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, दिपक लोंढे, अमोल पगारे, संतोष पवार या संशयितांसह टोळी मधील 9 संशयितांना आतापर्यंत अटक झाली आहे. तर, भूषण लोंढे फरार असून पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Ajay Bagul arrested
Nashik BJP leader Threat : एवढ्या धडक कारवाईत कुणाची हिंमत? नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला गोळ्या घालण्याची धमकी

दरम्यान कोणत्याही गुन्हेगाराला राजाश्रय दिला जाणार नाही असं स्वत:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. पोलिस आयुक्तांना कारवाईसाठी पूर्ण फ्री हॅण्ड देण्यात आले आहे. त्यामुळे छोटा असो की मोठा कोणताही गुन्हेगार आता पोलिस कारवाईतून सुटणार नाही असा इशाराच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com