जळगावच्या महापौरांवर शिंदे गटात येण्यासाठी दबाव?

नगरसेवकाच्या एसएमएस मध्ये अन्यथा जळगावचा विकास रोखण्याचा इशारा दिला.
Mayor Jayshree Mahajan
Mayor Jayshree MahajanSarkarnama

जळगाव : ‘तुम्ही शिंदे गटात या, (CM Eknath Shinde) अन्यथा जळगावचा (Jalgaon) विकास रोखण्यात येईल’, असा मेसेज जळगावच्या महापौर जयश्री महाजन (Jayshree Mahajan) यांना पाठविण्यात आला आहे. एका नगरसेवकाच्या माध्यमातून हा मेसेज टाकण्यात आला असल्याचे महापौर श्रीमती महाजन यांनी सांगितले. (SMS through Corporator to join Eknath Shinde group otherwise city devolopment will be stop)

Mayor Jayshree Mahajan
बंडखोर खासदार हेमंत गोडसे लपतछपत न येता थेट जल्लोषात आले...

राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार चुरस सुरू आहे. शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश करून घेण्यात येत आहेत. जळगावातही काही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. आज जिल्ह्यातील युवा सेनेच्या पदाधिकारी व महापालिकेतील काही नगरसेवकांनी माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी जळगावात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी म्हटले आहे, की धमकी देऊन काही जणांचा प्रवेश केला जात आहे. महापौर जयश्री महाजन यांनाही शिंदे गटाच्या एका नगरसेवकाच्या माध्यमातून मोबाईलवर मेसेज टाकून धमकी आली आहे. ‘तुम्ही शिंदे गटात या, अन्यथा जळगावचा विकास रोखण्यात येईल’, असेही त्यांनी म्हटले आहे. अशा धमक्यांना आम्ही कोणत्याही प्रकारे भीक घालत नाही, असेही सावंत यांनी म्हटले आहे.

Mayor Jayshree Mahajan
चार सदस्यांचा प्रभाग ही राहणार केवळ चर्चाच !

याबाबत महापौर जयश्री महाजन यांनीही पत्रकारांशी बोलताना सांगितले, की शिवसेना सोडून तुम्ही शिंदे गटात सहभागी झालात तर जळगावचा विकास होईल, अन्यथा जळगावचा विकास रोखण्यात येईल, असे मेसेज आपणास मोबाईलवर येत आहेत. महापालिकेत काही नगरसेवक दुसऱ्या गटाला भेटलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मेसेज आले आहेत. आपण जर शिवसेना सोडून शिंदे गटात आले तर जळगाव शहराचा विकास अजून चांगल्या पद्धतीने होईल. नाहीतर जळगाव शहराचा विकास थांबविला जाईल, कुठे तरी अडचणी निर्माण करण्यात येतील, अशा प्रकारचे मेसेज मला येत असल्याचे सांगितले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com