Maratha Andolan: गृहमंत्री फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा, हाच पर्याय!

Immediate Resignation of Devendra Fadanvis - जालना येथील मराठा उपोषणकर्त्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ सटाणा शहरात कडकडीत बंद
Maratha community agitation in Satana
Maratha community agitation in SatanaSarkarnama

Satana City News: अंतरवाली (सराटी) येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत. हा असंतोष थांबणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा देणे हाच यावर पर्याय आहे, असा इशारा आज सटाणा येथे झालेल्या आंदोलनावेळी देण्यात आला. (Maratha community called bandh in Satana city got huge responce)

मराठा (Maratha) उपोषणकर्त्यांवरील पोलिसांच्या (Police) लाठीमाराच्या निषेधार्थ आज सटाणा (Nashik) शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी राज्य शासनाचा निषेध करण्यात येऊन गृहमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी करण्यात आली.

Maratha community agitation in Satana
Sharad Pawar News : शरद पवारांचा जळगावात धमाका, तीनवेळा आमदार राहिलेला खानदेशातील भाजपचा 'हा' बडा नेता लावला गळाला

यानिमित्ताने सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष तसेच अन्य समाजाचाही पाठींबा मिळत आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी रोज आंदोलन तसेच बंदचे आवाहन केले जात आहे. सकल मराठा समाज आणि महाविकास आघाडीच्या वतीने आज सकाळी सटाणा शहरातील साक्री -शिर्डी महामार्गावर हजारो नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा महाविद्यालये व अत्यावश्यक सुविधा वगळता बंद यशस्वी झाला. आंदोलनात सकल मराठा समाजासह इतर समाज बांधवही सहभागी झाले होते. गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी विविध नेत्यांनी केली. यावेळी राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांच्यासह शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Maratha community agitation in Satana
Nashik Maratha Morcha : `मराठा` समाजात दहशत निर्माण करण्यासाठीच लाठीमार केला!

शासन आरक्षण शिस्तीत मागुन देत नसेल तर दोन हात करून लढण्याची तयारी सकल मराठा समाजाने ठेवली आहे. अशा तीव्र प्रतिक्रिया व्यासपीठावरून व्यक्त करण्यात आल्या. तहसिलदार कैलास चावडे, प्रभारी पोलिस अधिकारी आयपीएस रजनीकांत चिलुमुला यांना अर्पिता संभाजी सोनवणे, पुनम पंकज सोनवणे, सई दादु सोनवणे या लहान मुलींच्या हस्ते निवेदन देऊन आंदोलनाची सांगता झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com