Prafull Lodha : महाजन, पवार, ठाकरे अन् आंबेडकरांच्याही जवळचा... हनी ट्रॅपचा आरोप झालेला 'प्रफुल्ल लोढा' कोण आहे?

Prafull Lodha Honey trap case : जळगावच्या जामनेर तालुक्यातील प्रफुल्ल लोढा याच्यावर 'हनी ट्रॅप' चा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचे अनेक नेत्यांसोबत फोटो समोर आले आहेत.
Prafull Lodha Honey trap case
Prafull Lodha Honey trap caseSarkarnama
Published on
Updated on

Honey trap case : नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणाची राज्यभरात चर्चा आहे. तब्बल ७२ अधिकारी, आजी- माजी मंत्री या प्रकरणात अडकल्याचे बोलले जात आहे. असे, असतानाच जळगाव जिल्ह्यातही हनी ट्रॅपचं एक प्रकरण समोर आलं. जळगावच्या जामनेर तालुक्यातील प्रफुल्ल लोढा याच्यावर 'हनी ट्रॅप' चा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर भाजप व मविआच्या अनेक दिग्गज नेत्यांसोबत या लोढाचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे हा लोढा नक्की आहे कोण? त्याची कुणाशी जवळीक आहे असा सवाल उपस्थित झाला आहे.

प्रफुल्ल लोढा हा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील रहिवासी आहे. गावात त्यांची वडिलोपर्जित शेती आहे. प्लॉट, सिनेमा थिएटर त्याच बरोबर विविध ठेकेदारी व्यवसाय राहिला आहे. गिरीश महाजन सरपंच असल्यापासून प्रफुल्ल लोढा व त्यांची ओळख आहे. त्यानंतर भाजप कार्यकर्ता ते आरोग्यसेवक म्हणून जवळपास वीस वर्ष त्यांनी सोबत काम केलं. लोढा हे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते व आरोग्यसेवक असल्याचे सांगत. त्यानंतर महाजन यांच्यासोबत प्रफुल्ल लोढा यांनीही राजकारणात एण्ट्री केली. 1995 साली पंचायत समितीसाठी निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

गिरीश महाजन हे जेव्हा मंत्री झाले तेव्हा प्रफुल्ल लोढा हे महाजनांकडे मोठी कामे मागू लागले. त्यातूनच दोघांमध्ये खटके उडू लागले अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यातून महाजन यांना शह द्यायचा या उद्देशाने लोढा यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी 'एक बटण दाबले तर सगळं काही उघड होईल, असा दावा गिरीश महाजन यांचे नाव न घेता लोढा यांनी केला होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक असल्याचं जाहीर करत त्याने थेट उमेदवारीही जाहीर केली होती. मात्र, काहीच दिवसांत – अवघ्या पाच दिवसात – त्याने माघार घेतली.

त्यानंतर पुन्हा भाजपसोबत त्यांचे संबंध सुधारल्याची माहिती समोर आली. भाजपमध्ये किंवा इतर कोणत्याही पक्षात असतानाही त्यांना कोणतंही अधिकृत पद मिळालं नव्हतं. तसेच, एकनाथ खडसे यांच्या विरोधातही ते चर्चेत आले होते, जेव्हा त्यांनी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत पत्रकार परिषद घेतली आणि खडसे यांच्या मुलाच्या आत्महत्येबाबत संशय निर्माण करणारे वक्तव्य केलं होतं.

Prafull Lodha Honey trap case
Honey Trap Case : प्रफुल्ल लोढा नक्की कुणाच्या जवळचा? भाजप, मविआ दोन्हींच्या नेत्यांसोबत फोटो व्हायरल..

लोढावर मुंबईत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एक पोस्को कायद्याचा तर दुसरा बलात्कार आणि हनी ट्रॅपचा आहे. ते सध्या अटकेत आहेत. या दरम्यान एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन व लोढाचे जवळचे संबध असल्याचे आरोप केले. याप्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली. संजय राऊत यांनी लोढा यांना पेढा भरवताना गिरीश महाजनांचा फोटो ट्विट केला. त्यावेळी महाजन यांनीही लोढा याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल केले आहेत. लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता होता असं महाजन यांनी म्हटलं आहे.

Prafull Lodha Honey trap case
Manikrao Kokate : राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कुणाचा विनयभंग केला का? कोकाटे भडकले

भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा यांचा जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत वन टू वन बोलतानाचा फोटो समोर आणला आहे. त्याशिवाय सुप्रिया सुळे, जयंत पाटील, उद्दव ठाकरे, अजित पवार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतचा लोढा यांचा फोटो देखील महाजन यांनी समोर आणला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या मोबाईल मध्ये हे सर्व फोटो दाखवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com