Ahmednagar Politics : टक्केवारीशिवाय 'गतिमान' सरकारमध्ये काम होत नाही; आमदार तनपुरेंचा घाणाघात

Sharad Pawar Ncp Mla Prajakt Tanpure Criticises Mahayuti Government : राष्ट्रवादी काँग्रस शरद पवार गटाच्या आमदाराने भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Prajakt Tanpure
Prajakt TanpureSarkarnama
Published on
Updated on

Prajakt Tanpure Ahmednagar News :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्यातील महायुती सरकारविरोधात टोलेबाजी केली आहे. टक्केवारीमुळे गतिमान सरकारच्या कामात विलंब होत असल्याचा टोला आमदार तनपुरे यांनी लगावला आहे.

राज्य सरकारच्या Assembly Session आमदार तनपुरे यांनीही टोलेबाजी केली आहे. आमदार तनपुरे यांनी या वेळी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांचा संदर्भ दिला आहे. ही कामे मंजूर असून, ती रखडवली आहेत. ही कामे टक्केवारीच्या घोळात विलंबनाने सुरू होत असून, त्यावरील कार्यवाहीबाबत अक्षम्य चुका प्रशासनाकडून होत असल्याकडे लक्ष वेधले आहे.

Prajakt Tanpure
Lok Sabha Election 2024 : भाजपच्या पहिल्या यादीत नगरचा उमेदवार नसणार? काय आहे कारण?

आमदार तनपुरे म्हणाले, "मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्थसंकल्पात ७ हजार 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वास्तविक टप्पा तीनचे कामे सुरू होणे अपेक्षित होते. गतिमान सरकारचे या कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राहुरी विधानसभा मतदारसंघात मंजूर झालेली कामे गेली दीड वर्षापासून रखडली आहेत". 3 मे 2023 मध्ये कामाच्या निविदा मंजूर झाल्या. परंतु कार्यारंभ आदेश निघाला नाही. या कामाचे ठेकेदार खासगीत अधिकाऱ्यांच्या तडजोडी सुरू असल्याची चर्चा करत असल्याचा गंभीर आरोप आमदार तनपुरे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी मतदारसंघात रास्ता रोको आंदोलन केली. अधिकाऱ्यांना जाब विचारला. कामे कधी सुरू होणार, यावर आश्वासने मिळाली. सहा महिन्यांनी ठेकेदारांना कार्यारंभ आदेश मिळाले, असे गतिमान सरकारचे काम सुरू आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 7 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, परंतु टक्केवारीशिवाय या सरकारमध्ये काम होत नाही, असा गंभीर आरोपदेखील आमदार तनपुरे यांनी केला.

R

Prajakt Tanpure
Loksabha Election 2024 : भाजपच्या निरीक्षकांची चिडचिड अन् कार्यालयात पोहोचण्यास विलंब! नक्की काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com