Jayant Patil And Prajakt Tanpure : जयंत पाटलांनी गेम फिरवला? सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशांच्या चर्चांना ब्रेक? उद्याच्या भूमिकेकडे लक्ष

Prajakt Tanpure meeting with Supriya Sule sparks fresh buzz over his political future amid BJP entry talks and Ahmednagar MLC election drama : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याने भाजप प्रवेशाच्या चर्चांना ब्रेक लागल्याची नवी चर्चा सुरू झाली आहे.
Jayant Patil And Prajakt Tanpure
Jayant Patil And Prajakt TanpureSarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule Prajakt Tanpure meeting : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे.

तनपुरे यांनी पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाचा पत्ता कट झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. या घडामोडींमागे तनपुरेंचे मामा आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीनंतर तब्बल महिना-दीड महिन्यांनी प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्क साधल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे, विधान परिषदेसाठी भाजपकडून अजूनही आपल्यासाठी दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले जात असल्याने तनपुरेंच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.

अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या (MLC Election) पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. भाजपकडे संख्याबळ जास्त असल्याने पक्षाने या जागेवर जोरदार दावा केला आहे. मात्र महायुतीतील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ही जागा सोडण्यास नकार दिला आहे.

Jayant Patil And Prajakt Tanpure
Ram Shinde : भाजपमध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध शब्द दिलेले’ संघर्ष? राम शिंदेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

यातच शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप तसेच माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. संग्राम जगताप यांनीही अप्रत्यक्षपणे या जागेवरील दावा जिवंत असल्याचे संकेत दिले आहेत.

Jayant Patil And Prajakt Tanpure
Sachin Jagtap MLC Election : प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर? ससाणे-जगताप-भोसले यांनी नेले अर्ज, अहिल्यानगरच्या राजकारणात पुढील 48 तास निर्णायक

याच काळात प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेतला होता. मात्र त्यांनी आज सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याने या चर्चांना मोठा ब्रेक लागल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, राहुरी पोटनिवडणुकीनंतर तनपुरे प्रथमच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी प्रत्यक्ष संपर्कात आल्याचे पाहायला मिळाले. या भेटीमागे जयंत पाटील यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे तनपुरे अखेर शरद पवार गटातच राहणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान प्राजक्त तनपुरे उमेदवारीसाठी तयारीत होते. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्यानंतर त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले. विधान परिषदेसाठी भाजपकडून तनपुरेंना संधी मिळू शकते, अशीही जोरदार चर्चा सुरू होती. मात्र भाजपमधील निष्ठावंत नेत्यांनी आता खुली भूमिका घेतल्याने समीकरणे बदलताना दिसत आहेत.

राम शिंदेंनी निष्ठावंतांसाठी.....

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पक्षातील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी जोरदार भूमिका मांडली आहे. देवळाली प्रवरा नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्या पत्नी प्रीती कदम, ज्येष्ठ नेते प्रा. भानुदास बेरड, माजी नगराध्यक्ष वसंत लोढा यांसारख्या कार्यकर्त्यांची नावे पुढे करत राम शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाचे लक्ष वेधले.

भाजपमध्येही उमेदवारीसाठी चुरस

प्रा. राम शिंदेंची ही भूमिका म्हणजे प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला अप्रत्यक्ष विरोध मानला जात आहे. त्यामुळे भाजपमध्येही उमेदवारीवरून मोठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील, असेही राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

तनपुरेंनी उद्या भूमिका मांडणार का?

दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश शनिवारी (30 तारखेला) होणार असल्याच्या चर्चांनी जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर तनपुरे उद्या नेमकी कोणती भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तनपुरेंची त्यावेळची प्रतिक्रिया

विशेष म्हणजे, राहुरी पोटनिवडणुकीदरम्यान तनपुरे यांनी मी महाविकास आघाडीतच आहे. 2029 मध्ये पुन्हा सत्ता आणण्यासाठी काम करणार, असे स्पष्ट विधान केले होते. त्यामुळे आता त्यांच्या पुढील राजकीय पावलाकडे केवळ अहिल्यानगरच नाही, तर राज्याच्या राजकारणाचेही लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com