Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अधिवेशन, आमदार तनपुरेंनी सरकारला सुनावले...

Prajakt Tanpure : 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षण प्रश्नावर एक दिवसाचे अधिवेशन बोलवण्यात आले आहे.
Prajakt Tanpure
Prajakt Tanpure sarkarnama
Published on
Updated on

Nagar : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले आहे. परंतु यावर विशेष अधिवेशनाच्या कालावधीवरून 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार'पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी हे सरकार या विषयावर खरचं गंभीर आहे का? असा सवाल करत सुनावले आहे.

Prajakt Tanpure
Atpadi Politics : निधी अवघा दोन कोटींचा; श्रेयवाद रंगला सत्ताधाऱ्यांच्या दोन गटांत!

'मनापासून अधिवेशन घ्यायची सरकारची इच्छा असेल, तर किमान तीन दिवस तरी अधिवेशन घ्यावे. उगाच नौटंकी नको. या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल व साधकबाधक चर्चा होणे आवश्यक आहे', असे आमदार प्राजक्त तनपुरे (prajakt Tanpure) यांनी सरकारच्या विशेष अधिवेशनाबाबत ट्विटरवरून आपले मत व्यक्त करत सरकारला सुनावले.

'20 तारखेला मराठा आरक्षण (Martha Rejarvesan ) प्रश्नावर एक दिवसाचे अधिवेशन बोलवण्यात येत आहे. एका दिवसात किती आमदार आपलं मत व्यक्त करू शकणार आहेत? पुढच्या रांगेत बसणारे सात ते आठ लोकं निम्मा दिवस घेणार. बाकीच्यांना अध्यक्ष दोन मिनिटात बेल मारणार.' असे आपल्या ट्विटमध्ये म्हणत मराठा आरक्षणा प्रश्नी आमदारांना आपले मत व्यक्त करण्यासाठी वेळच मिळणार नाही, अशी भीती देखील तनपूरे यांनी व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे संबंधित राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणासाठी बुधवारी (ता.14) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. याला राज्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. याचवेळी राज्य सरकारची मंत्रिमंडळाची तातडीची बैठक झाली. यात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत कायदा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

मराठा समाजाला शिक्षणात 12 आणि नोकरीमध्ये 13 टक्के आरक्षण देण्याबाबत कायदा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्य सरकारवर दबाव वाढला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 फेब्रुवारीला एक दिवसाचे विशेष आंदोलन बोलावले आहे. मात्र, अवघ्या एक दिवसाचा कालावधी या अधिवेशनाचा असल्याने आमदार तनपूरे यांनी सरकारला सुनावले आहे.

(Edited By Roshan More)

Prajakt Tanpure
Nagpur Congress : आसाराम बापूविरोधात महिला काँग्रेस रस्त्यावर; आक्रमक आंदोलन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com