MLA Prajakt Tanpure : आमदार तनपुरे पाटबंधारेच्या कारभारावर संतापले; वाबोंरी चारीवरून सत्ताधाऱ्यांना सुनावले

Prajakta Tanpure Aggressive for repair of wambori chari : वाबोंरी चारीच्या नादुरुस्त मोटार आणि चारीच्या दुरवस्थेवरून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पाटबंधारे विभागाच्या कारभारा संताप व्यक्त केला. पाटबंधारे प्रशासनाने कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.
Prajakt Tanpure
Prajakt TanpureSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : वाबोंरी चारीची नादुरुस्ती मोटार पुढील दहा दिवसात कार्यान्वित न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावर आधारित राहुरी, नगर, नेवासा आणि पाथर्डी परिसरातील जिरायत शेतकऱ्यांसाठी वाबोंरी चारी वरदान ठरते. परंतु मोटार कार्यन्वित नसल्याने ही चारी बंद अवस्थेत आहे. यावरून आमदार तनपुरे यांनी सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला.

अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या जलसिंचन भवनातील मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या कार्यालयात आमदार तनपुरे यांच्यासह शेकडो लाभार्थी शेतकऱ्यांनी (Farmer) वाबोंरी चारीच्या दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन केले. आमदार तनपुरे यांनी लाभार्थ्यांच्या भावना प्रशासनासमोर मांडल्या. मुळा धरण साठा निम्म्याच्या पुढे गेला आहे. लवकरच धरण भरण्याच्या मार्गावर आहे. धरण भरल्यानंतर अतिरीक्त पाण्यातून वांबोरी चारीच्या माध्यमातून 45 गावांतील 102 तलाव भरले जातात. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्यासाठी वांबोरी चारीचे पाणी महत्त्वाचे ठरते. परंतु ही चारी नादुरुस्तीच्या अवस्थेत आहे. प्रशासनाने यात लक्ष घालून त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.

Prajakt Tanpure
Congress In Ahmednagar : काँग्रेसच्या डोळा नगर शहर मतदारसंघावर; महासंकल्प मेळाव्यातून दावा ठोकणार

वाबोंरी चारी ही शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. या चारीच्या दुरुस्तीकडे सत्ताधाऱ्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले. प्रशासनाने तसे करू, नये अशी अपेक्षा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली. वाबोंरी चारीवर असलेल्या तीनपैकी एक मोटार नादुरुस्त आहे. त्यामुळे पाणी उपसा होताना अडचणी येऊ शकते. यामुळे टेलपर्यंत पाणी पोचणे देखील अवघड होऊन बसले आहे. वांबोरी चारीवरील मोटारीची दुरुस्ती तातडीने करावी. प्रशासनाने दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा. सत्तेत नसले, तरी काय झाले आमदार सर्वांचाच आहे. शेतकऱ्यांसाठी प्रशासनाला कोणतीही मदत करण्यासाठी आपण पुढे आहोत, असे आमदार तनपुरे यांनी सांगितले.

Prajakt Tanpure
Gulabrao Patil : भाजप आमदारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी मंत्री गुलाबराव पाटील निरुत्तर!

कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी आमदार तनपुरे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत वाबोंरी चारीवरील मोटार तातडीने दुरुस्ती होईल, असे आश्वासन दिले. तसेच चारीतील इतर दुरुस्तीचे कामे मार्गी लावली जातील. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सुनील लवांडे, उपअभियंता विलास पाटील, वांबोरी शाखेचे अभियंता विजय मोगल आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com