

Sujay Vikhe statement : राहुरी पोटनिवडणूक न लढवण्याच्या निर्णय घेणारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे मी अजून महाविकास आघाडीत असल्याचे सांगत असतानाच, त्यांच्यासाठी भाजप काय निर्णय घेणार, यावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विखे पाटलांनी प्रतिक्रिया देताना, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे बोट दाखवलं. 'ज्यांनी ज्यांनी या आमदारकीसाठी माघार घेतली आहे, त्यांचा नक्कीच विचार होईल,' असे विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई महत्त्वाची ठरली. यानंतर प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये दिसतील, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
भाजप (BJP) प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना, 'मी यावर भाष्य करू शकत नाही. मात्र भाजप प्रदेशाध्यक्षांनी यावर भाष्य केलं आहे की, ज्यांनी ज्यांनी या आमदारकीसाठी माघार घेतली, त्यांचा नक्कीच विचार होईल', असं म्हटलं.
दरम्यान, निवडणुकीपूर्वी हिंदुत्वावर स्वार झालेल्या प्राजक्त तनपुरे, भाजपमध्ये येतील, अशी चर्चा होती. त्यावेळी आमची गाडी भरलेली आहे. आणखी किती जणांना बसवणार, अशी सूचक प्रतिक्रिया देत विखे पाटलांनी विरोध दर्शवला होता.
विखे पाटलांनी प्रदेशाध्यक्षांकडे बोट दाखवले असतानाच, तनपुरेंनी आपण महाविकास आघाडी सोडलेली नाही, भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, पुढे 2029 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार यावं, यासाठी आम्ही रणसंग्रामात असणार आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
प्राजक्त तनपुरेंच्या या प्रतिक्रियेमुळे विखे पाटलांनी भाजप प्रदेशाध्यक्षांकडे तनपुरेंबाबत दाखवलेले बोटाकडे राजकीयदृष्ट्या कितपत महत्त्वाचे ठरते, हे आगामी काळात दिसेल. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीपेक्षा प्राजक्त तनपुरेंची आगामी भूमिका सर्वाधिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
इयत्ता आठवीतील पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवल्याने वाद निर्माण झालेला आहे. सुजय विखे पाटील यावर म्हणाले, एखादा पुस्तकातून किंवा धड्यातून मराठ्यांचा इतिहास काढून टाकला म्हणजे, मराठा काय एवढा कमकुवत नाही. मराठा हा लोकांच्या मनामनात आहे. मात्र असं काही घडलं असेल, तर ते अत्यंत चुकीच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.