Vikhe and Thorat : विखे पिता-पुत्र खरगेंना भेटल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा! ; थोरात म्हणतात, 'मला विचारल्याशिवाय...'

Nagar Lok Sabha Constituency : 'भाजपमध्ये त्यांची परिस्थिती कठीण झालेली आहे. त्यांनी आतापर्यंत गेल्या काही वर्षांमध्ये पाच-सहा वेळा पक्षांतर केले.' असंही थोरात म्हणाले आहेत.
Radhakrishna Vikhe, Balasaheb Thorat, Sujay Vikhe
Radhakrishna Vikhe, Balasaheb Thorat, Sujay VikheSarkarnama

Loksabha Electio 2024 : भाजपचे स्टार प्रचारक तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली असल्याचं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. यावर महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मला विचारल्याशिवाय काहीही होणार नाही, असे ठामपणे सांगितले. तसेच, भाजपमध्ये त्यांची परिस्थिती कठीण झाली आहे. त्यांना आणखी मी काही नाराज करणार नाही. पुढे काय करायचं ते ठरवू, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी नगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा झाली. या प्रचार सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना "वॉर्निंग बेल" आहे, असे म्हणत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे यांची विखे पिता-पुत्रांनी भेट घेतली असल्याचा गौप्यस्फोट केला.

बाळासाहेब थोरात यांच्या हातात असलेली राज्यातील काँग्रेस, मंत्री विखे यांच्यामुळे पुन्हा जाऊ शकते, असेही प्रकाश आंबेडकर यांनी विधान करून नगरच्या राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडून दिली. प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांच्या या गौप्यस्फोटानंतर विखे आणि थोरात यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहाणे उत्सुकतेचे ठरले होते. यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe, Balasaheb Thorat, Sujay Vikhe
Radhakrishn Vikhe News : म्हसोबाच्या साक्षीनं मंत्री राधाकृष्ण विखेंनी सांगितले, 'राम शिंदे अन् मी...'

बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी मंत्री विखे यांचे नाव न घेता प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब थोरात म्हणाले, "मला याबाबत काहीसे कानावर आले होते. त्यांची पुन्हा आता काँग्रेससाठी धडपड सुरू झाली आहे. आणखी एक त्यांचे वैशिष्ट्य आहे, कोणाची सत्ता येणार आहे, हे त्यांना लवकर कळते. माझ्यासाठी ही कोणत्याही प्रकारची धोक्याची घंटा नाही.

परंतु मला विचारल्याशिवाय काहीही होणार नाही. त्यांना घेण्याबाबत आम्ही ठरवू, त्यांना काही नाराज करणार नाही. भाजपमध्ये त्यांची परिस्थिती कठीण झालेली आहे. त्यांनी आतापर्यंत गेल्या काही वर्षांमध्ये पाच-सहा वेळा पक्षांतर केले आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत काय करायचं हे आम्ही काळाच्या ओघात ठरवू.'' असेही थोरात यांनी म्हटले.

नगर जिल्ह्यामध्ये भाजप महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजपकडून पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांच्या सभांच्या आणि रोड-शोचे आयोजन करण्यात आले आहे. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, "महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके(Nilesh Lanke) सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यांची ही लढाई धनदांडग्या उमेदवाराविरुद्ध आहे. हे सर्वसामान्यांनी ओळखले आहे. त्यामुळे नीलेश लंके यांच्याविरुद्ध कितीही दिग्गजांनी सभा घेऊ द्यात. परंतु सर्वसामान्य हे नीलेश लंकेंनाच विजयी करणार, असा दावाही बाळासाहेब थोरात यांनी केला.

Radhakrishna Vikhe, Balasaheb Thorat, Sujay Vikhe
Dinesh Kumar Sharma : 'वोट जिहादच्या राजकारणाला मतांच्या क्रांतीतून उत्तर मिळेल' ; दिनेशकुमार शर्मांचा विरोधकांना इशारा!

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पूरक, असे वातावरण आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये झालेल्या मतदानामध्ये क्वचित एखादी जागा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला जाऊ शकते. इतर जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगले यश मिळेल. पुढील टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. एकंदर देशातच महाविकास आघाडी इंडियाला चांगले वातावरण असल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com