Prakash Ambedkar News : 'पंतप्रधान मोदींना 'मौत का सौदागर' म्हणावे'; आंबेडकरांचा घणाघात

Narendra Modi : मोदींनी लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळला. लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या पंतप्रधानांना पुन्हा सत्तेत बसवायचे का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला.
Prakash Ambedkar Narendra Modi
Prakash Ambedkar Narendra Modisarkarnama

Nagar Political News : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. कोव्हिड काळात लोकांच्या आरोग्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळ खेळला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना आता खरे मौत का सौदागर म्हणणे गरजेचे आहे, असे वंचितचे पक्ष प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Prakash Ambedkar Narendra Modi
Kalyan Lok Sabha : डोंबिवलीत ठाकरेंना पुन्हा झटका उपजिल्हाप्रमुखासह माजी नगरसेविका शिंदे गटात दाखल

वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पक्षाचे नगरमधील उमेदवाराच्या प्रचारासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज (शनिवारी) नगरमध्ये सभा झाली. प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी देशातील प्रस्थापित पक्षांतील घराणेशाहीवर नगरमधील सभेत तोफ डागली.'पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राजकारण अतिशय भयानक आहे. कोरोना काळामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी Narendra Modhi लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोना काळात रेमडिसिव्हर औषधाच्या वापरावर बंदी घातली होती.

त्याच्या वापराला पंतप्रधानांनी सर्रास परवानगी दिली. रेमडिसिव्हर औषध निर्माण करणारी कंपनी ही गुजरातच्या मालकाची होती. या औषधाला परवानगी देण्याच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉन बॉण्ड घेतले गेले. या औषधाला संपूर्ण जगात बंदी असताना देशात वापरले गेले, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळला गेला. लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या पंतप्रधानांना पुन्हा सत्तेत बसवायचे का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला.देशाला आर्थिक संकटामध्ये नेण्याचे पाप यांनी केले असून दहा वर्षांमध्ये मोदींनी काढलेले कर्ज कुठे गेले? त्याचा वापर कोणी केला? हे आता पंतप्रधान मोदींनी सांगितले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आर्थिक संकटात आणले आहे. अशा परिस्थितीला बनाना रिपब्लिक असे म्हटले जाते. यातून देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येते. या देशाची परिस्थिती अशी झाली आहे कोणीही यावे आणि टिकली लावून जावे. पंतप्रधान मोदींनी देशाला अशा उंबरठ्यावर आणून ठेवले आहे, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

(Edited By Roshan More)

Prakash Ambedkar Narendra Modi
Kalyan Lok Sabha : डोंबिवलीत ठाकरेंना पुन्हा झटका उपजिल्हाप्रमुखासह माजी नगरसेविका शिंदे गटात दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com