Kalyan Lok Sabha : डोंबिवलीत ठाकरेंना पुन्हा झटका, उपजिल्हाप्रमुखासह माजी नगरसेविका शिंदे गटात दाखल

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का देण्याचे तंत्र शिंदे गटाकडून सातत्याने सुरू आहे.
Kalyan Lok Sabha
Kalyan Lok SabhaSarkarnama
Published on
Updated on

loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडत आहे. निवडणुकीचे वारे वाहत असतांनाच मागील काही काळापासून राज्यात तोडफोडीचे राजकारण चालू आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला धक्का देण्याचे सत्र शिंदे गटाकडून नेहमीच होताना दिसते. यातच आता कल्याण ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांनी शनिवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला. ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठवडाभराच्या आतच ठाकरे गटाला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना ठाकरे गटातील ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे हे ग्रामीण भागात सक्रिय होते. त्यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Kalyan Lok Sabha
Nashik Lok Sabha Election 2024 : वाजेंच्या बालेकिल्ल्यात हेमंत गोडसेंचा एकाकी प्रचार, कोकाटे फिरकलेच नाही; कारण...

पक्षप्रवेशावेळी बोलतांना म्हात्रे म्हणाले 'श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 10 वर्षात कल्याण लोकसभेत विकासाची गंगा आणली असून आपण आता विकासापासून अलिप्त राहू शकत नाही. तसेच शिवसेनेत 40 वर्ष काम करूनही मला मातोश्रीवर कुणी ओळखत नाही. बाळासाहेब हयात होते, तोपर्यंत आमची श्रद्धा होती, पण आता आमची मातोश्री ठाणेच आहे,' अशी भावना यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली.

शिवसेनेची (Shivsena) बंडखोरी झाल्यानंतरही प्रकाश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली नाही. पिंपळेश्वर महादेव मंदिर हे डोंबिवलीतील तीर्थक्षेत्र असून ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम हे म्हात्रे यांच्या कार्यकाळात राबविले गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून म्हात्रे ओळखले जातात. शिवसेनेतील फुटीनंतर म्हात्रे यांच्यावर ठाकरे गटाचा त्यांच्यावर दबाव येत होता. अखेर श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला होता.

Kalyan Lok Sabha
Vidhan Parishad Election :'टीडीएफ'ला विधानपरिषदेचे वेध; शिक्षकांना हवा हक्काचा आमदार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com