Prakash Ambedkar News : 'राहुल गांधीचे दलित प्रेम मतांसाठी', प्रकाश आंबेडकरांनी साधला निशाणा

Rahul Gandhi : तेलंगणा पोलिसांनी, काँग्रेस राज्य सरकारच्या अंतर्गत, रोहित वेमुला प्रकरण बंद केले आहे. तेलंगणामध्ये रोहितची आई राधिका 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झाली होती. त्यावेळेचा राहुल गांधी राधिका वेमुलाला मिठी मारतानाचा फोटो ॲड. आंबेडकरांनी हे ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे.
Prakash Ambedkar and Rahul Gandhi
Prakash Ambedkar and Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar News: काँग्रेस नेते राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित विरोधी असल्याची टीका करत आहे. मोदींना संविधान बदलायचे आहे, असा आरोप राहुल गांधी करत आहेत. मात्र, तेलंगणामध्ये काँग्रेसचे Congress सरकार असताना तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला यांचे बंद केले आहे. या प्रकरणी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत राहुल गांधींवर निशाना साधाल.

Prakash Ambedkar and Rahul Gandhi
Sangli Loksabha : प्रकाश आंबेडकरांना आनंदराज आंबेडकरांचा धक्का, सांगलीच्या उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

यांचे दलित, आदिवासी, मुस्लिम प्रेम सर्व दिखाव्याचे आहे. त्यांना फक्त आपले मतदान हवे आहे बाकी काही नाही. आता सांगा भाजप - आरएसएस हे एकमेकांपासून कसे वेगळे आहेत ? असा सवालही राहुल गांधी यांचा फोटो ट्विट करत प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी विचारला आहे.

तेलंगणा पोलिसांनी Police रोहित वेमुला प्रकरण बंद केले आहे. तेलंगणामध्ये रोहितची आई राधिका 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झाली होती. त्यावेळेचा राहुल गांधी राधिका वेमुलाला मिठी मारतानाचा फोटो ॲड. आंबेडकरांनी हे ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे.

प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करत आहेत. साताऱ्यातील काँग्रेसचा मोठा नेते निवडणुकीनंतर भाजपमध्ये जाणार आहे. तसेच काँग्रेस आणि भाजपमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

Prakash Ambedkar and Rahul Gandhi
Sushma Andhare : एक मोठा धडाम आवाज अन् त्यानंतर स्मशान शांतता; हॅलिकॉप्टर क्रॅशचा अंधारेंनी सांगितला थरार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com