Karmala Politics : मोहिते पाटलांनी बाजी पलटवली; करमाळ्याची बाजार समिती बिनविरोध करून दाखवली

Karmala Krushi Bazar Samiti Election : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणे ही करमाळा तालुक्याच्या राजकारणातली खूप मोठी घटना...
Ranjitsinh Mohite Patil , Karmala Krushi Bazar Samiti Election
Ranjitsinh Mohite Patil , Karmala Krushi Bazar Samiti ElectionSarkarnama
Published on
Updated on

आण्णा काळे

Karmala Politics : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच या लढतीकडे करमाळ्यासह सगळ्या सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते. या बाजार समितीची निवडणूक पाटील गट, बागल गट, जगताप गट, शिंदे गट, भाजप आणि प्रहार जनशक्ती संघटनेने प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीसाठी एकूण 154 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असे चित्र निर्माण झाले होते. पण या निवडणुकीत अखेरच्या क्षणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी बाजी पलटवत इतिहासात पहिल्यांदाच करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करून दाखवली.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध होण्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना माजी आमदार नामदेवराव जगताप यांनी केली आहे. पण गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सभापती निवडीवेळी बंडखोरी झाल्याने जगताप गटाची 29 वर्षांची सत्ता गेली होती. या वेळी पुन्हा एकदा जगताप गटाकडे बिनविरोध सत्ता देण्याची भूमिका सर्वच नेत्यांनी घेतली आहे.(Karmala Krushi Bazar Samiti Election )

Ranjitsinh Mohite Patil , Karmala Krushi Bazar Samiti Election
Girish Mahajan Chaundi : गिरीश महाजनांच्या शिष्टाईने चौंडीतील आंदोलन थांबणार का ?

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणे ही करमाळा तालुक्याच्या राजकारणातली खूप मोठी घटना समजली जात आहे. या सर्व घडामोडींचे सर्वाधिक श्रेय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनाच द्यावे लागेल. याशिवाय बाजार समितीची ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांना आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी सहकार्य केले आहे.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार नारायण पाटील(Narayan Patil) व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी अकलूज येथे बैठक घेऊन शुक्रवारी समन्वय घडवून आणला. या बैठकीत बाजार समितीची सत्ता बिनविरोध जगताप यांना देण्याचा निर्णय घेतला. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतलेला पुढाकार खूप महत्त्वाचा ठरला आहे.

या बाजार समितीच्या निवडणुकीत पाटील गट व बागल गट एकत्र येतील आणि त्यांना आमदार शिंदे समर्थक सावंत गटाची साथ मिळेल, अशी शक्यता गृहीत धरली होती. त्यादृष्टीने सर्व तयारीदेखील झाली होती. त्यामुळे पाटील- बागल -सावंत विरुद्ध जगताप -शिंदे अशी निवडणूक होईल, असे गृहीत धरून सर्व गट कामाला लागले होते. अशा परिस्थितीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील(Ranjitsinh Mohite Patil) यांनी जगताप- पाटील -बागल यांना एकत्र आणले.

मागील बाजार समिती सभापती निवडीच्या वेळी पाटील गटाचे माजी सभापती शिवाजी बंडगर यांनी बंडखोरी करत बागल गटात जाऊन सभापतिपद मिळवले होते आणि त्यामुळे जगताप गटाची सत्ता गेली होती. या वेळी मोठा वाद झाला. यातून माजी आमदार जयवंतराव जगताप त्यांच्या दोन मुलांवरती 307 चा गुन्हा दाखल झाला होता.

Ranjitsinh Mohite Patil , Karmala Krushi Bazar Samiti Election
Sharad Pawar On PM Modi: मोदींची टीका चुकीची; सर्वात आधी आरक्षण...; शरद पवारांनी थेट इतिहासच सांगितला

त्यामुळे या पंचवार्षिक निवडणुकीत हे तीनही गट एकत्र येतील, अशी कोणतीही शक्यता नव्हती. अशा परिस्थितीत या तिघांना एकत्र करण्याचे काम रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे. यावरून राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रू आणि कोणकोणाचा कायमचा मित्र नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

बागल गटाला दोन व पाटील गटाला दोन ग्रामपंचायत मतदारसंघातील जागा देण्यात आल्या. त्यानुसार उर्वरित उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. आमदार संजय शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप हे सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात एकत्र आहेत.

बाजार समिती जगताप गटाकडे राहावी, या भूमिकेतून आमदार संजय शिंदे यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भरलेले उमेदवार अर्ज मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर दोन दिवसांत शिंदे गटाचे सर्व उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले होते. शिंदे समर्थक सुनील सावंत यांनी सोमवारी अर्ज मागे घेतला.

Ranjitsinh Mohite Patil , Karmala Krushi Bazar Samiti Election
Raj Thackeray News : राज ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालय आणि मनसैनिकांचेही यासाठी मानले आभार

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी पाटील गट, बागल गट व जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी आपले उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतले. मात्र, भाजपचे व प्रहार जनशक्ती संघटनेचे उमेदवारी अर्ज निघणार की राहणार अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, शेवटच्या दहा मिनिटांत भाजप व प्रहार जनशक्ती संघटनेच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. उमेदवारी अर्ज घेऊन मागे घेण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत या निवडणुकीबाबत उत्सुकता कायम राहिली.

(Edited By Deepak Kulkarni)

Ranjitsinh Mohite Patil , Karmala Krushi Bazar Samiti Election
BJP-NCP Politics : शरद पवार आमच्यासोबत आले तर...; धनंजय महाडिकांनी व्यक्त केली इच्छा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com