Ajit Pawar Politics : काँग्रेसमध्ये आवाज दाबला गेला, अजितदादांनी प्रतिभा शिंदेंना दिली आता बोलण्याची संधी

Pratibha Shinde NCP : कॉंग्रेसमध्ये माझा आवाज दाबला जात असून मी आवाज दाबू देण्याऱ्यांमधली नाही असे राहुल गांधी यांना सांगत प्रतिभा शिंदे यांनी कॉंग्रेस सोडली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Pratibha Shinde, Ajit Pawar
Pratibha Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar news : दोन वर्षांपूर्वीच प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पक्षाने दुसऱ्यांदा प्रदेश उपाध्यक्षपदी जबाबदारी दिली होती. मात्र तरीही त्यांनी तडाकाफडकी कॉंग्रेसचा राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

आदिवासी समाजाच्या नेत्या म्हणून प्रतिभा शिंदे यांची ओळख आहे. आदिवासींसह इतर वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठीच दोन वर्षांपूर्वी त्यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. कॉंग्रेसनेही त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदी संधी दिली होती. लोकसभा व विधानसभेला काँग्रेसच नव्हे तर महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचा त्यांनी प्रचार देखील केला.

त्यानंतर स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता कॉंग्रेसने त्यांची पुन्हा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. प्रदेश कार्यकारिणीवर संधी मिळून आठ दिवस उलटत नाही तोच प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवून दिला. इतक्या तडकाफडकी त्यांनी राजीनामा का दिला यावरुन जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. कॉंग्रेससाठीही तो फोटो झटका होता, कारण शिंदे यांनीही राजीनाम्याचे नेमके कारण प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात नमूद केलेले नव्हते.

Pratibha Shinde, Ajit Pawar
Hemlata Patil : शिवसेनेत मन रमलं नाही म्हणून राष्ट्रवादीत आल्या, हेमलता पाटील यांच्यावर अजित पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी

मात्र, नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. काँग्रेसमधून बाहेर पडण्यास जिल्हास्तरापासून राज्यस्तरावरील सगळेच नेते आणि पदाधिकारी कारणीभूत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. काँग्रेसच्या बैठकीला न बोलविण्यापासून न बोलू देण्यापर्यंतचे राजकारण आपल्या सोबत करण्यात आलं. राहुल गांधी यांची भेट घेऊन आपण काँग्रेसमध्ये काम करणे आता शक्य नाही, माझा आवाज दाबला जात आहे, त्यामुळे मी पक्षात राहू शकत नाही असे सांगितल्याचे प्रतिभा शिंदे यांनी म्हटले होते.

Pratibha Shinde, Ajit Pawar
Jarange Patil : दोघांचाही बाजार उठवेन... धनंजय मुंडेंवर टीका करताना जरांगेंचा अजित पवारांनाही इशारा

त्यानंतर जळगावात १७ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीचा मेळावा झाला. याच मेळाव्यात प्रतिभा शिंदे यांनी पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत लोकसंघर्ष मोर्चाच्या त्यांच्या हजारो समर्थकांसह प्रवेश केला. त्यानंतर आता अजित पवार यांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिभा शिंदे यांची थेट पक्षाच्या प्रदेश प्रवक्ता पदावर वर्णी लावली आहे. पक्षाची ध्येय धोरणे, विचार, भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com