Hemlata Patil : शिवसेनेत मन रमलं नाही म्हणून राष्ट्रवादीत आल्या, हेमलता पाटील यांच्यावर अजित पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी

Ajit Pawar Politics : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने हेमलता पाटील यांनी कॉंग्रेस सोडली होती. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता.
Hemlata Patil, Ajit Pawar
Hemlata Patil, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. परंतु शिवसेनेची काम करण्याची स्टाईल त्यांना रुचली नाही. शिवसेनेतील गटबाजीवर आसूड ओढत त्यांनी अवघ्या दोनच महिन्यात शिवसेनेला रामराम ठोकला.

शिंदे सेनेत मन न रमलेल्या हेमलता पाटील यांनी त्यानंतर विचारधारेची कास पकडत अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीची निवड केली. दीड महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या समर्थकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता अजित पवारांनी त्यांना पक्षप्रवेशाची बक्षीसी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भातील नियुक्तिपत्र डॉ. पाटील यांना प्रदान केले आहे.

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून हेमलता पाटील या कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढवण्यास इच्छुक होत्या. पण त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराजीतून त्यांनी कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेस नेत्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले. कॉंग्रेसमध्ये माझा राजकीय मर्डर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Hemlata Patil, Ajit Pawar
Bhaskar Bhagre : बनावट प्रशासकीय मान्यतेप्रकरणात राष्ट्रवादीच्या सरांची परीक्षा, चौकशीला सामोरे जावे लागणार

त्यानंतर हेमलता पाटील यांनी 11 फेब्रुवारी 2025 रोजी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदासह प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्लीत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पण अवघ्या -दीड दोन महिनेही त्या शिवसेनेत राहिल्या नाहीत. शिवसेनेत अपघाती प्रवेश झाल्याचे सांगत त्या बाहेर पडल्या.

डॉ. पाटील यांनी गत दीड महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका व विचार मांडण्यासाठी पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे तटकरे यांनी दिलेल्या नियुक्तिपत्रात नमूद करण्यात आलेले आहे.

Hemlata Patil, Ajit Pawar
Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामांमध्ये भ्रष्टाचार कराल तर तुरुंगात खडी फोडायला जाल, आयुक्त गेडामांचा ठेकेदारांना इशारा

फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा जपत पक्षाची ध्येय धोरणे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या माध्यमांच्या मार्फत मी जनतेसमोर मांडण्यासाठी कटिबद्ध राहीन. पक्षप्रवक्ता हा पक्षाचा चेहरा असतो अशा परिस्थितीत स्वतः चे वैयक्तिक मत न मांडता त्याने पक्षाची भूमिका समर्थपणे मांडायची असते याचे भान मी सतत राखेन अशी प्रतिक्रिया निवडीनंतर हेमलता पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याचे सांगत त्यांचेही धन्यवाद पाटील यांनी मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com