Puja Khedkar Legal Trouble: बडतर्फ, प्रशिक्षणार्थी आयएएस महिला अधिकारी पूजा खेडकर हिच्या अडचणीत नवी भर पडली आहे. आता नाशिकच्या महसूल आयुक्तांची वक्रदृष्टी तिच्यावर पडली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आणखी एका प्रकरणाची भर पडली.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला महाराष्ट्र शासनाने सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. आयएएस प्रशिक्षण संस्थेने ही तिच्यावर कारवाई केली आहे. सध्या त्या दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या तत्पुरत्या जामीनावर बाहेर आहेत.
आता पूजा खेडकर हिच्या नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राचा विषय पुढे आला आहे. आयएएस सेवेत दाखल होण्यासाठी तिने बनावट नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप आहे. या तक्रारीची दखल नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी घेतली आहे.
या संदर्भात विभागीय महसुल आयुक्तांनी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना पूजा खेडकर हिच्या आणि कुटुंबीयांच्या मालमत्त्यांबाबत अहवाल मागविला होता. हा अहवाल नुकताच जिल्हाधिकाऱ्यांनी महसुलायुक्तांना सादर केला आहे. या अहवालात खेडकर कुटुंबीयांच्या १२ मालमत्तांचा उल्लेख असल्याचे समजते. याशिवाय अन्य काही महसुलाचा तपशील देखील देण्यात आलेला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या मालमत्तेच्या अहवालात नॉन क्रिमीलेअर अटीसाठी असलेल्या शर्तीचा भंग होतो आहे. या सवलतीसाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा खेडकर यांच्याकडे अधिक मालमत्ता आहे. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र रद्द का करू नये, अशी नोटीस पूजा खेडकर हिला बजावण्यात आली आहे.
या संदर्भात पूजा खेडकर हिला येत्या २५ मार्चला विभागीय महसूल कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूजा खेडकर हिचा जबाब नोंदविल्यानंतर महसूल विभाग नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रा विषयी पुढील निर्णय घेणार आहे. सध्याच्या स्थितीत खेडकर हिचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र रद्द होण्याची शक्यता अधिक असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.
प्रशिक्षणार्थी कालावधीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असताना पूजा खेडकर हिने सहकारी अधिकाऱ्यांना त्रास दिला होता. तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दालन जबरदस्तीने स्वतःच्या ताब्यात घेतले होते. यांसह विविध तक्रारी आल्याने पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा अहवाल शासनाला पाठविला होता. त्या अहवालानुसार पूजा खेडकर हिला बडतर्फ करण्यात आले होते.
सध्या पूजा खेडकर हिला बडतर्फी बरोबरच आयएएस प्रशिक्षण संस्थेने देखील विविध कारणांसाठी सुरू असलेल्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. दिल्ली न्यायालयातही तिच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आलेला आहे. सध्या दिल्ली न्यायालयाने दिलेल्या तत्पुरत्या जामीनावर पूजा खेडकर बाहेर आहेत. एकंदरच पूजा खेडकर हिच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यात आता एका नव्या समस्येची भर पडली आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.