Loksabha Election : कोल्हापूर, हातकणंगलेत 'अंडर करंट'चा झटका? 30 दिवसांच्या मेहनतीवर अवघ्या 36 तासांत पाणी

Mahavikas Aghadi vs Mahayuti : महिनाभर प्रचाराच्या निमित्ताने गाव पिंजून काढणाऱ्या उमेदवारांना शेवटच्या दोन दिवसाची रणनीती आणि डावपेच धोका देऊ शकतो, याची शक्यता निर्माण झाली आहे.
 shahu maharaj sanjay mandlik dhairyashil mane raju shetti
shahu maharaj sanjay mandlik dhairyashil mane raju shetti sarkarnama

Kolhapur Loksabha : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शिवसेनेचे धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांच्यात तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार संजय मंडलिक विरुद्ध महाविकास आघाडीचे शाहू महाराज छत्रपती यांच्यात लढत होत आहे. राज्यात सर्वाधिक चर्चेत असणारी ही लोकसभा निवडणूक आहे. अशातच गेल्या 30 दिवसांपासून प्रचाराचं रान उठलेल्या दोन्ही मतदारसंघात जनाधार कोणाच्या बाजूला असणार हे आत्ताच सांगणे कठीण बनले आहे. दोन्ही मतदारसंघात lok sabha constituency शेवटच्या चार दिवसात मोठे अंडरकरंट तयार झाले असून त्याचा फटका महिनाभर तयारी करत असलेल्या मातब्बर उमेदवारांना देखील बसण्याची शक्यता आहे.

 shahu maharaj sanjay mandlik dhairyashil mane raju shetti
Pankaja Munde and Modi : पंकजा मुंडेंसाठी बजरंग सोनवणेंच्या 'होमपिच'वर होणार मोदींची सभा!

त्यामुळे महिनाभर प्रचाराच्या निमित्ताने गाव पिंजून काढणाऱ्या उमेदवारांना शेवटच्या दोन दिवसाची रणनीती आणि डावपेच धोका देऊ शकतो, याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी Raju shetti यांनी महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याबाबत असणारी नाराजी उघड उघड बाहेर आल्याने सहाजिकच मतदार स्वाभिमानीच्या पारड्यात आपले मत टाकतील अशी चर्चा उमटत होती. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महाविकास आघाडीत जाण्यास लावलेला विलंब आणि अटीशर्तीमुळे महाविकास आघाडीत Mahavikas Aghadi न जाण्यास निर्णय घेतल्याने शेट्टी स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिले.

महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी देण्यात आली. पन्हाळा शाहूवाडीमध्ये असणारी माजी आमदार पाटील यांची ताकद, शिराळा आणि इस्लामपूर मधून मिळणारीं जयंत पाटील यांची रसद आणि हातकणंगले मधील तीन माजी आमदार यांची मिळणाऱ्या ताकतीच्या जीवावर सध्या तरी सत्यजित पाटील सरूडकर यांचे पारडं जड मानले जात आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा शिरोळ मधील बालेकिल्ला आणि मागील लोकसभा निवडणुकीचा विचार करता पन्हाळा शाहूवाडी आणि शिराळा तालुक्यातील घेतलेले मताधिक्य हे शेट्टी यांच्याच बाजूने ठाम राहण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर महायुतीकडून शिरोळ, इचलकरंजी आणि हातकणंगले मध्ये धैर्यशील माने यांची पकड सध्या तरी मजबूत दिसते. पण मागील दीड दिवसाच्या कालावधीत त्यातून बरेच अंडर करंट बाहेर आले आहेत. हातकणंचगले लोकसभा मतदारसंघात महाविकासच्या सुरू असलेल्या सोप्या वाटचालीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आड येऊ शकते. असे चित्र निर्माण झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला छुप्या राजकीय हातांचे बळ मिळण्याची शक्यता दाट आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ही हेच चित्र आहे. सुरुवातीच्या काळात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांनी घेतलेली प्रचारातील आघाडी महत्त्वपूर्ण होती. मात्र, महायुतीकडून संजय मंडलिक यांचे नाव जाहीर झाल्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांचे मंडलिक यांच्या बाजूने लावलेले बळ तितकेच महत्त्वपूर्ण आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात तीनवेळा दौऱ्या करत ठिय्या मांडला. नाराजांची मने वळवण्यास मुख्यमंत्री यशस्वी झालेत का? हे येत्या चार तारखेला कळेल. मात्र, सध्या गादीच्या मान-पानावरून सुरु झालेले राजकारण राधानगरीच्या पाण्यापर्यंत येऊन पोहचले आहे. त्यालाच दिलेले प्रत्युत्तर मंडलिक यांच्या बाजूची फळी काळमवाडीच्या डाव्या कालव्यापर्यंत येऊन पोहोचले आहे.

केलेले आरोप आणि त्याच तोडीचे प्रत्यारोप या निवडणुकीतील सर्वात जास्त चर्चेचे विषय ठरले आहेत. दत्तक प्रकरणावरून मिळणारी सहानुभूती आणि होणारे बुमरँग कोणाच्या पथ्थ्यावर पडणार हे आत्ताच सांगणे कठीण आहे. करवीर आणि दक्षिणमध्ये शाहू महाराज छत्रपती यांना मताधिक्य असेल. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर, उत्तर आणि राधानगरी मधून दोघेही सम समान असतील असा तर्क राजकीय तज्ञांकडून लावला जात आहे. तर, महायुतीतील खासदार संजय मंडलिक हे चंदगड आणि कागलमधून मताधिक्य घेतील, असा अंदाज लावला जात आहे. मात्र करवीर, चंदगड, राधानगरी आणि कागल मधील राजकीय परिस्थिती पाहता पुढील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील कोणता नेता कोणता गेम खेळणार हे देखील महत्त्वाचं आहे.

 shahu maharaj sanjay mandlik dhairyashil mane raju shetti
Pankaja Munde and Modi : पंकजा मुंडेंसाठी बजरंग सोनवणेंच्या 'होमपिच'वर होणार मोदींची सभा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com