President Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी ताफा थांबवला, राजशिष्टाचार टाळले अन्..., एका कृतीने जिंकली मुलांची मनं

Trimbakeshwar Kumbh Mela: नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पिंपळगाव बहुला येथे वाहनांचा ताफा थांबवला. विद्यार्थ्यांची विचारपूस करून त्यांना चॉकलेट्स दिल्याने हा प्रसंग चर्चेत आला.
President Draupadi Murmu
President Draupadi MurmuSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Kumbh Mela News: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी उपस्थित होत्या. नाशिकवरुन त्र्यंबकेश्वरला जाताना त्यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवत आपल्या वाहनांचा ताफा थांबवल्याने काहीवेळ सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी रस्त्यावर थांबलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. या अनपेक्षित कृतीने विद्यार्थी आणि त्यांचे पालक भारावून गेले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहणासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जात असताना पिंपळगाव बहुला येथे रस्त्याच्या कडेला राष्ट्रपतींचा ताफा पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक, महिला आणि नागरिकांची गर्दी जमली होती. ही गर्दी पाहून राष्ट्रपतींनी आपला ताफा थांबवण्याचा निर्णय घेतला आणि थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांची आस्थेने विचारपूस केली. 'तुम्ही काय करता?', 'शाळेत जाता का?', 'कितवीत शिकता?' असे प्रश्न त्यांनी मुलांना विचारले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट्सही दिली. राष्ट्रपती अचानक आपल्यासमोर आल्याने सुरुवातीला विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना नेमके काय घडत आहे, याचा अंदाजच आला नाही.

President Draupadi Murmu
CM Fadnavis Foot March : दिल्लीत काँग्रेसचा मोर्चा, ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रस्त्यावर उतरले, पदयात्रेतून निशाणा; म्हणाले,...

राष्ट्रपतींनी या विद्यार्थ्यांची चार मिनिटे संवाद केल्यावर त्या पुन्हा आपल्या वाहनात जाऊन बसल्या. त्यानंतर त्यांचा ताफा त्र्यंबकेश्वर कडे रवाना झाला. यावेळी परी तिकडे या मुलीने राष्ट्रपती भेटल्या आणि त्यांनी चॉकलेट दिले याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला. मी सहावीत आहे असे राष्ट्रपतींना सांगितले. माझ्या दृष्टीने हा एक वर्णनीय आणि आयुष्यभर लक्षात ठेवावा असा प्रसंग होता असे तिने सांगितले.

दरम्यान, राष्ट्रपतींचा वाहनांचा ताफा अचानक थांबल्याने सुरक्षा यंत्रणेत काही काळ धावपळ उडाली. पायलट कारसह काही वाहने पुढे निघून गेली होती. मात्र, राष्ट्रपतींचे वाहन थांबल्याने सुरक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नेमके काय घडले, याचा अंदाजच आला नाही.

President Draupadi Murmu
Satara Dcc Bank Election : मतदान करताच शिवेंद्रसिंहराजेंनी बोलून दाखवली मनातील खंत : ‘CM’नी दिलेली जबाबदारी पार पाडली; पण सर्वाधिक मतदान असूनही...

राष्ट्रपतींनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून थेट विद्यार्थ्यांमध्ये मिसळत त्यांची विचारपूस केल्याचे दृश्य उपस्थितांसाठी अनपेक्षित होते. नागरिकांनी हे क्षण मोबाईलवर टिपले. त्यानंतर हे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. राष्ट्रपतींच्या या सहज आणि आपुलकीच्या भेटीची परिसरात चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.