CM Fadnavis Foot March : दिल्लीत काँग्रेसचा मोर्चा, ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रस्त्यावर उतरले, पदयात्रेतून निशाणा; म्हणाले,...

Devendra Fadnavis Vs Congress : राहुल गांधी आणि काँग्रेस संविधानविरोधी नरेटिव्ह तयार करत आहेत. मात्र, देश संविधानानेच चालेल आणि जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभी राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
CM Fadnavis Foot March
CM Fadnavis Foot Marchsarkarnama
Published on: 
Updated on: 

Devendra Fadnavis News : दिल्लीत काँग्रेसकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी रामलिला मैदानावर आंदोलन करत आहेत. देशभरातून काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनासाठी दिल्लीत जमले आहे. काँग्रेसच्या या आंदोलनाला भाजपने विरोध करत 'नौटंकी' संबोधले आहे. त्यातच आज ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रस्त्यावर उतरले. पदयात्रा काढून त्यांनी राहुल गांधींच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ अभियानद्वारे पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि देशाची लोकशाही वाचवण्यासाठी देशभक्त नागरिक रस्त्यावर उतरले असून, ही पदयात्रा देशातील अराजकतेच्या विरोधात काढली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, मतदारयादी शुद्धीकरणाच्या एसआयआर प्रक्रियेत अडीच कोटी मृत मतदारांची नावे मतदारयादीतून काढून टाकल्याबद्दल काँग्रेस पक्षाला इतके दुःख का होत आहे. यापूर्वी काँग्रेसच्या काळात आठ वेळा एसआयआर झाला होता. आताच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने प्रत्येक राजकीय पक्षाला बूथ स्तरावर बीएलओ देण्याचा आणि चुकीचे नाव कट झाले असल्यास हरकत अर्ज नोंदवण्याचा अधिकार दिला आहे. संपूर्ण देशात काँग्रेसच्या एकाही बीएलओने नाव चुकीचे कट केल्याचा एकही अर्ज दिलेला नाही, कारण त्यांना माहिती आहे की कट केलेली नावे चुकीची नाहीत.

जिथे नाव कट तेथे तृणमूल विजयी

मुख्यमंत्री म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये ज्या २० जागांवर सर्वाधिक नावे कट झाली, त्यांपैकी १३ जागांवर तृणमूल काँग्रेस निवडून आली आहे. SIR मुळे बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदारयादीतून बाहेर पडत असल्यामुळेच विरोधक विरोध करत आहेत असा आरोप त्यांनी केला

CM Fadnavis Foot March
Maharashtra Live Politics Update : निषेध करा, मोर्चा काढा, रॅली काढा आणि थोडी खरेदीही करा; राहुल गांधी यांचे आवाहन

जनता मोदींच्या मागे

जोपर्यंत मतदारयादीतील शेवटच्या बांगलादेशी घुसखोराचे नाव हटवले जात नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील; मतदानाचा अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या लढ्यामागे आंतरराष्ट्रीय ताकदी, सोशल मीडियाचे अल्गोरिथम आणि पैशांचा मोठा वापर सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून ही अराजकता मुळासकट उपटून फेकून, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात 'विकसित भारत' घडवेपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

CM Fadnavis Foot March
Congress vs BJP protest in Delhi : काँग्रेसचा रामलीला मैदानावर ‘महामोर्चा’, तर प्रत्युत्तरासाठी भाजप सज्ज; 1 नोव्हेंबरला विरोध मार्च, दिल्लीत काय घडणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.