Chhagan Bhujbal News : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांना जाणता राजा म्हटलं होतं. यावरुन भाजप नेत्यांनी टीकाही केली होती. आता नागपुरातील एका चित्र प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पेंटिंगमध्ये मोदींना विष्णू अवतार तर दुसऱ्या पेंटिंगमध्ये भगवान राम दाखविण्यात आलं आहे. मात्र, या चित्रांमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना जाणता राजा म्हणण्यावर आक्षेप घेतानाच छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता भुजबळांनी बावनकुळेंसह भाजप नेत्यांवर पलटवार केला आहे. यावेळी बावनकुळेंनी माझी काळजी करु नये असा सल्ला देतानाच मी शरद पवारां(Sharad Pawar)च्या नजरेत कायमच एक नंबर आहे असा टोलाही लगावला.
भुजबळ म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी अशाप्रकारची हास्यास्पद विधानं करू नये. शरद पवारांना जाणता राजा का म्हणालो, याचं स्पष्टीकरण मी आधीच दिलं आहे. पवारांनी शेतकऱ्यांचे 80 हजार कोटी रुपये कर्ज माफ केले, उद्योगधंदे आणले, देशाच्या अन् राज्याच्या विकासात योगदान दिलंय. म्हणूनच त्यांना जाणता राजा म्हणालो. याचा अर्थ मी त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करतो असं नाही असंही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
कशाला वाद वाढवायचा...?
छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) म्हणाले, 'बसवेश्वरा महात्मा होते, त्यांना आपण आजही महात्मा म्हणतो. त्यानंतर महात्मा म्हणून आपण महात्मा फुले यांच्यासह गांधीजींना महात्मा म्हणून संबोधतो. चांगली कामे करणाऱ्याला विशेषणं दिली तर अडचण काय आहे? तुम्ही नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हणता, आम्ही काय म्हणालो? तुम्हाला ते विष्णूचे अवतार वाटतात तुम्ही म्हणा, आम्हाला पवारसाहेब गोरगरीबांचे जाणता राजा वाटतात. कशाला वाद वाढवायचा...' असं रोखठोक मत व्यक्त करताना भाजपला खडेबोल सुनावले आहे.
महात्मा वगैरे पदव्या या भारतरत्नासारख्या पदव्या नसतात. त्या जनतेतून दिलेल्या असतात. पवारांना जनतेनेच जाणता राजा म्हटलं. लोकांच्या अडचणीला पवार धावून जातात म्हणून लोकांना त्यांना ही पदवी दिली. तुम्हाला काय अडचण असा सवालही उपस्थित करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
बावनकुळे नेमकं काय म्हणाले होते ?
छगन भुजबळांच्या शरद पवारांना जाणता राजा ही पदवी दिली होती. यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी भुजबळांना टोला लगावला होता. बावनकुळे म्हणाले , या जगातील जाणता राजा हे केवळ छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव आहेत. त्यांच्याशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही. भुजबळांचं आयुष्य समाजकारणात, राजकारणात गेलं आहे, त्यांनी अशी विधानं करु नये. मात्र, त्यांना प्रदेशाध्यक्ष पद हवं असल्यानं ते अशी विधानं करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.