Manoj Jarange: जरांगेंनी पुन्हा आंदोलन का पुकारलं? एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ आश्वासनांवर पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेली आश्वासने जाहीर करावीत, अशी मागणी करत पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला.
Prithviraj Chavan, Devendra Fadanvis, Prithviraj Chavan
Prithviraj Chavan, Devendra Fadanvis, Prithviraj Chavansarkarnama
Published on
Updated on
  • मनोज जरांगेंची सरकारने दिशाभूल केल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

  • जरांगेंना दिलेली आश्वासने जाहीर करण्याचे चव्हाणांचे सरकारला आव्हान

  • मराठा आरक्षणासाठी जरांगेंकडून पुन्हा मुंबई आंदोलनाची घोषणा

Prithviraj Chavan News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्य सरकार विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा राज्य सरकारची अडचण करणार अशी स्थिती आहे.

मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील आंदोलकांना गाव सोडण्याचे आवाहन केले आहे. लोकांना मुंबईला येण्याचे आवाहन त्यांनी केले. पाच लाख मराठा आंदोलकांचा मुंबई आंदोलनाची घोषणा त्यांनी केली.

पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे काँग्रेस म्हणून जरांगे पाटील यांच्या पाठीशी असणार का?

मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आंदोलन केले. त्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

Prithviraj Chavan, Devendra Fadanvis, Prithviraj Chavan
Maharashtra Hindi Exam: हिंदी भाषा परीक्षा अखेर रद्द! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; सरकारने सांगितले कारण

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना प्रशासनाने मनोज जरंगे पाटील यांना आश्वासन दिले होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. त्यात राज्य सरकारचे अधिकारी आघाडीवर होते. या अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांना कोणती आश्वासने दिली? हे जाहीर करावे असे आव्हान चव्हाण यांनी दिले.

Prithviraj Chavan, Devendra Fadanvis, Prithviraj Chavan
Teacher Jobs: पवित्र पोर्टलवर निवड झाली? थांबा! नियुक्तीपूर्वी ‘या’ कागदपत्रांची होणार काटेकोर पडताळणी

आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाची घोषणा करावी लागली. याचा अर्थ त्यांना देण्यात आलेली आश्वासने सरकारने पाळलेली नाहीत. आश्वासने पूर्ण झाली नसल्यानेच आंदोलनाची घोषणा झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून नक्कीच जरांगे पाटील यांची दिशाभूल करण्यात आली आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com