Priyanka Gandhi News : प्रियंका गांधींनी जिंकली आदिवासींची मने; मोदींचा उडवला धुव्वा!

Narendra Modi काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी नंदुरबार येथील सभेत घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार
Priyanka Gandhi, Narendra Modi
Priyanka Gandhi, Narendra Modisarkarnama

Gandhi Vs Modi Politics : नंदुरबार मतदारसंघाच्या काँग्रेसच्या प्रचाराची सांगता आज प्रियंका गांधी यांच्या जाहीर सभेने झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी झालेल्या सभेची पार्श्वभूमी होती. प्रियंका गांधी यांनी मोदी यांच्या वक्तव्याची अक्षरशा चिरफाड केली. आदिवासींच्या टाळ्या, घोषणांनी ही सभा गाजली.

नंदुरबार येथे आज सकाळी काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा झाली. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री के. सी. पाडवी, जयदीप रावल यांचे विविध नेते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी झालेल्या सभेला उत्तर म्हणून त्याकडे पाहिले जाते. उपस्थित आणि या दोन्ही सभांची तुलना केली प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आदिवासी आणि शबरी या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याची अक्षरश: चिरफाड केली. गर्दीच्या अंगानेही ही सभा उजवी म्हणता येईल अशी होती.

Priyanka Gandhi, Narendra Modi
Nandurbar constituency: निवडून आल्यानंतर विसरण्याचा भूमिकेमुळे हिना गावित अडचणीत?

पंतप्रधान मोदी यांनी "मी शबरीचा भक्त आहे"असे विधान केले होते. त्याचा श्रीमती गांधी यांनी समाचार घेतला. भाजप आणि आरएसएस हे आदिवासींच्या संस्कृतीचा आदर करीत नाहीत. या संघटना ही संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करतात असा आरोप त्यांनी केला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देशातील एकमेव आदिवासी मुख्यमंत्री आहेत. त्यांना भाजपने जेलमध्ये टाकले आहे.

नव्या संसद भवनाचे उद्घाटन करताना राष्ट्रपतींना निमंत्रित करण्यात आले नाही. मोदी यांनी स्वतःच उद्घाटन केले. श्रीराम मंदिराचे लोकार्पण करताना राष्ट्रपतींना निमंत्रित केले नाही. आदिवासींचा मान देखील ते स्वतःकडे घेतात. मग ते शबरीचे भक्त कसे?. कुठे शबरीचा सन्मान करणारे श्रीराम आणि कुठे मोदी? असा सवाल त्यांनी केला.

Priyanka Gandhi, Narendra Modi
Priyanka Gandhi News : रायबरेली, अमेठी मतदारसंघाची जबाबदारी प्रियंका गांधींवर

देशात शेकडो शबरीचा अपमान होताना पंतप्रधानांनी आपले तोंड का उघडले नाही?. हाथरस आणि उन्नाव येथील महिलांवर अत्याचार झाले. तेव्हा पंतप्रधान मोदी गप्प का होते?. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तेव्हा ते का गप्प होते?. महिला कुस्तीपटूंवर अत्याचार झाले. तेव्हा त्यांनी दखल घेतली नाही?. उलट अत्याचार करणाऱ्यांच्या मुलांना त्यांनी उमेदवारी दिली आहे. कुठे श्रीराम आणि कुठे शबरी? असे प्रश्न त्यांनी सभेत वारंवार केले.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

Priyanka Gandhi, Narendra Modi
Nana Patole On Narendra Modi : शरद पवारांवरील टीका नानांच्या जिव्हारी; पंतप्रधान मोदींचा घेतला समाचार...

प्रत्येक प्रश्नाला उपस्थितांनी घोषणा देत सहमती व्यक्त करत होते. ही सभा संपल्यावर परतणाऱ्या मतदारांनी प्रियंका गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची तुलना नक्कीच केली असणार. कार्यकर्त्यांमध्ये देखील प्रियंका गांधी यांचे हे भाषण चर्चेचा विषय ठरले. त्यामुळे नंदुरबार मतदार संघाच्या काँग्रेसच्या प्रचारात आज प्रचाराची सांगता होत असताना झालेली ही सभा किती परिणामकारक ठरते हे निवडणुकीच्या निकालातून दिसेल.

Edited By : Umesh Bambare

Priyanka Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi Vs PM Modi : 'काय झालं मोदीजी घाबरलात का?' ; अदानी-अंबानींच्या जाहीर उल्लेखावरून राहुल गांधींचा मोदींना टोला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com