बीएचआर घोटाळा : जामिनावर सुटताच कंडारेला पुन्हा बेड्या

महाराष्ट्रातील अनेक गुंतवणूकदारांना कंडारेने गंडा घातल्याचा आरोप
BHR Khandare
BHR Khandare

Sarkarnama 

Published on
Updated on

जळगाव : बीएचआर घोटाळ्यातील (BHR society scam) प्रमुख संशयित तथा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेला (Jitendra Kandare) शुक्रवारी (ता. २४) जामीन मिळाला. त्याची कारागृहातून सुटका होत नाही, तोच पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली आहे. जामीन मिळाल्याचा आनंद त्याचा फारकाळ काही टिकला नाही. रविवारी (ता. २६) त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

BHR Khandare
नितीन राऊत आणि नाना पटोले यांचे सभागृहातच `क्राॅस कनेक्शन!`

बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारे याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदूरमधून अटक केली होती. अटक केलेल्या गुन्ह्यात त्याच्याकडून जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता. त्यानुसार न्यायालयाने त्याचा ५० हजारांच्या जातमुचलक्यावर शुक्रवारी जामीन मंजूर केला. दोन जामीनदार आणि साक्षीदारांवर दबाव टाकू नये, अशा अटी कंडारेला जामीन देताना घालण्यात आल्या होत्या.

दुसरीकडे कंडारेची येरवडा कारागृहातून मुक्तता होण्याआधी शिक्रापूरच्या गुन्ह्यात तपासाधिकारी पोलिस निरीक्षक सुरज बंडगर पोलिस नाईक रऊफ शेख यांच्यासह पथकाने त्याला कारागृहातून निघताच पुन्हा ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी करण्यात येउन अटकेची कारवाई करत कंडारेला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली आहे.

BHR Khandare
नितीन राऊतांना मोठा धक्का; काँग्रेसनं पद घेतलं काढून!

शिक्रापूरच्या फिर्यादीत नेमके काय?

संतोष कांबळे (वय ५७, रा. लोहगाव, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील काशिनाथ कांबळे हे सन १९९० मध्ये शिक्षक पदावरुन निवृत्त झाले. वर्ष २०१४ मध्ये कांबळे कुटुंबीयांनी बीएचआर पतसंस्थेत आकर्षक व्याज देणारी जाहिरात एका वृत्तपत्रात पाहिली होती. संतोष कांबळे यांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांनी वडीलांसोबत चर्चा करून सेवानिवृत्तीचा सर्व पैसा बीएचआरमध्ये ठेवून त्याच्या व्याजावर घर खर्च करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार काशिनाथ कांबळे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी या दोघांनी पुण्यातील बीएचआरच्या भीमा कोरेगाव व शिक्रापूर या दोन्ही शाखांमध्ये विविध योजनांतर्गत वर्षभरासाठी पैसे गुंतवले. नंतर पुन्हा मुदत वाढवली. त्यांच्या ठेवींच्या बदल्यात दोन्ही शाखांनी मिळून १८ लाख ७ हजार १५९ रुपये त्यांना देय होते. परंतु, मुदत संपल्यानंतरही कांबळे यांना पैसे परत मिळाले नाही. अखेर कांबळेंचा मृत्यू झाला. तरीसुद्धा त्याच्या मुलास पैसे न देता पावत्या मॅचिंग करण्यााचा सल्ला अवसायक जितेंद्र कंडारेने दिला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात त्याला पुन्हा अटक झाल्याचे तपासाधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com