Radhakrishna Vikhe On Uddhav Thackeray : 'महाविकास आघाडी भ्रमात, त्यांची ही शेवटची निवडणूक'; मंत्री विखे असं का म्हणाले?

Radhakrishna Vikhe criticism that Mahavikas Aghadi is delusional : उद्धव ठाकरे यांना शिवसेनापेक्षा उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीची काळजी आहे. लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडी भ्रमात आहे. विधानसभेच्या निवडणुकीला महायुतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील.
Radhakrishna Vikhe On Uddhav Thackeray
Radhakrishna Vikhe On Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Radhakrishna Vikhe News : महाविकास आघाडीची ही शेवटची निवडणूक आहे. कारण ते भ्रमात आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडील उरली-सुरली शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे. तशी मुख्यमंत्री शिंदेंकडे येण्याची तयारी देखील केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावरील दौऱ्याला देखील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी कोपरखळी लगावली. फेसबुकवरून बांधावर जाताय. ही चांगली गोष्ट आहे, असा चिमटा मंत्री विखे यांनी काढला.

भाजप (BJP) नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीला अपघाताने यश मिळाले. लोकसभेनंतर महाविकास आघाडीने विधानसभेला, असेच यश मिळेल, या भ्रमात राहू नये. महायुतीच्या 200 च्यावर जागा निवडून येतील, असा विश्वास आम्हाला आहे.

Radhakrishna Vikhe On Uddhav Thackeray
Radhakrishna Vikhe On Nilesh Lanke : खासदार लंकेंच्या आंदोलनाची धार वाढली; मंत्री विखे मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. तिथे शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन पिक परिस्थितीची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी पिकांना मिळत नसलेल्या हमीभावाची कैफियत मांडली. महाविकास आघाडीचे सरकार आणा आणि पिकांना भाव घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.

Radhakrishna Vikhe On Uddhav Thackeray
Bhausaheb Wakchaure : खासदार वाकचौरे यांच्या महसूल बैठकीत शिवसैनिक आक्रमक; नेमकं काय घडलं...

मंत्री राधाकृष्ण विखे यांनी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या कृतीवर उपरोधात्मक टीका केली. चांगलं आहे. पूर्वी घरात होते. नंतर फेसबुकवर आले. आता बांधावर जाताय. चांगली गोष्ट आहे, असे मंत्री विखे यांनी म्हटले. मंत्री विखे यांनी शिवसेना पुन्हा एकदा फुटणार असा दावा केला. उद्धव ठाकरे यांना शिवसेनापेक्षा महाविकास आघाडीची काळजी आहे. उरली-सुरली शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत येण्याची तयारी झाली आहे, असे मंत्री विखे यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com