Radhakrishna Vikhe On Nilesh Lanke : खासदार लंकेंच्या आंदोलनाची धार वाढली; मंत्री विखे मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

Radhakrishna Vikhe will discuss the movement of Nilesh Lanke : कांदा आणि दुधाला दरवाढ मिळावी म्हणून खासदार नीलेश लंके यांनी जनआक्रोश आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेकडो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी खासदार लंके यांच्याशी चर्चेसाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे.
Radhakrishna Vikhe On Nilesh Lanke
Radhakrishna Vikhe On Nilesh Lanke Sarkarnama

Radhakrishna Vikhe News : खासदार नीलेश लंके यांनी कांदा आणि दुधाच्या दरवाढीवर सुरू केलेल्या आंदोलनाची धार वाढू लागली आहे. नगर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून या आंदोलनात शेतकरी सहभागी होत आहे.

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. यातच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी खासदार नीलेश लंके यांच्याशी आवश्यकता वाटल्यास चर्चा करू, असे म्हटले आहे. परंतु ही भेट कधी, केव्हा आणि कोठे होणार हे स्पष्ट केलेले नाही.

शेतकऱ्यांसाठी सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. नीलेश लंके खासदार म्हणून आंदोलन करत आहेत, यात काही वावग नाही. त्याला राजकीय रंग देण्याची माझी भूमिका नाही. आवश्यकता वाटल्यास नीलेश लंके यांच्याशी करण्याची माझी तयारी आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी दिली. तत्पू्वी मंत्री विखे यांनी अकोले तालुक्यातील गणोरे इथं शुभम आंबरे आणि संदीप दराडे या तरुणांनी दूध दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनाला भेट दिली. सात दिवसापासून हे तरुण शेतकरी बेमुदत उपोषण करत होते. दुधाला 40 रुपये भाव मिळावा, या मागणीवर त्यांचे उपोषण सुरू होते.

Radhakrishna Vikhe On Nilesh Lanke
Nilesh Lanke : नीलेश लंके सरकारची डोकेदुखी वाढवणार; जयंत पाटील, सुप्रिया सुळे नगरला आंदोलनासाठी येणार

मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या युवकांची भेट घेऊन सरकार त्यादृष्टीने पाऊले उचलत आहे. दुधाला (Milk) हमीभाव देण्यासाठी सरकार लवकर निर्णय जाहीर करणार असल्याचे आश्वासन मंत्री विखे यांनी दिल्यानंतर या युवकांनी उपोषण स्थगित केले. यावेळी मंत्री विखे यांनी खासदार नीलेश लंके यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. आवश्यकता वाटल्यास नीलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे, असे मंत्री विखे यांनी म्हटले.

Radhakrishna Vikhe On Nilesh Lanke
Radhakrishna Vikhe Vs Prajakta Tanpure : 'वाळू सत्ताधाऱ्यांसाठी अवघड जागेचं दुखणं'; अधिवेशनानंतर मंत्री विखेंच्या 'नियोजन समिती'च्या बैठकीत वाळू 'गाजली'

नीलेश लंके यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आंदोलनाची धार वाढली आहे. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लंके यांच्या आंदोलनाला समर्थन वाढू लागले आहे. आंदोलनाच्या समर्थनात नगर शहरात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी नगरच्या रस्त्यावर उतरले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. सरकार आणि प्रशासनाला आता तरी जागे व्हा, असा इशारा नीलेश लंके यांनी दिला. आम्ही आमच्या हक्काचे मागतो आहे. तिथं कोठेही तडजोड नाही. एकदा ठरवलं ना, ठरवलं, असे म्हणून नीलेश लंके यांनी आंदोलनाची भूमिका ठाम ठेवली.

दुधाच्या व्यवसायात अनिश्चितता आहे. जागतिक बाजार पेठएत भुकटीचे भाव पडल्याने निर्यात बंद आहे. मागणीपेक्षा दुधाचे उत्पादन जास्त आहे. परिणाम भावावर झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनुदानासह 35 रुपयाप्रमाणे भावाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट दुधाला हमीभाव मिळावा यासाठी घेतली होती. ऊसाच्या एफआरपीप्रमाणे दुधासाठी एमएसपी कायदा करण्याची मागणी केल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com