Shivsena Shinde politics: ठाकरे गटाला धक्का, माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या गोटात!

Shivsena Eknath Shinde; Shivsena Thakre's Ex corporator Madhukar Jadhav join Shinde Group-महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे समर्थक झाले आक्रमक.
Madhukar Jadhav with CM Eknath Shinde
Madhukar Jadhav with CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर तयारी केली आहे. नेते आणि मंत्र्यांनी राजकीय स्तरावर मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Madhukar Jadhav with CM Eknath Shinde
Nashik Politics: भाजपअंतर्गत राजकारणाने रखडली चक्क "गोदेची आरती"

या संदर्भात आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव आणि सातपूर परिसरातील मनसेचे पदाधिकारी बाजीराव दातीर या दोघांनी शिवसेनेच्या शिंदे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत या दोघांनीही वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला अशी माहिती शिवसेना शिंदे पक्षाचे महानगर प्रमुख बंटी तिदमे यांनी दिली.

Madhukar Jadhav with CM Eknath Shinde
Water Politics: सत्ताधाऱ्यांतच जुंपली, मंत्री संजय शिरसाठ यांनी दिला भाजपला 'हा' इशारा...

त्यामुळे नाशिक शहरात शिवसेनेच्या ठाकरे पक्षाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिला धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांनी याबाबत आक्रमक धोरण स्वीकारले आहे. अन्य पक्षातील नेत्यांना आणि विशेषतः प्रबळ उमेदवार होतील, अशा नेत्यांना शिवसेना शिंदे पक्षाकडून आमिष आणि राजकीय प्रलोभने दाखविण्याचे काम जोरात सुरू आहे.

शहरात प्रभाव सिद्ध करण्यासाठी धडपड करणाऱ्या शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाची बांधणी सुरू आहे. या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या एका मोठ्या नेत्याला गळाला लावण्याचे त्यांचे प्रयत्न होते. त्याबाबत शहरात जोरदार राजकीय चर्चा होती. मात्र ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही.

महापालिकेत मावळत्या कालावधीत भारतीय जनता पक्षाची स्वबळावर सत्ता होती. सध्या भाजप आपली सत्ता कायम राहण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. या संदर्भात पक्षाच्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात जनसंपर्क आणि मोर्चे बांधणीवर भर दिला आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांकडून यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. विशेषत: भारतीय जनता पक्षाला अन्य पक्षांना बरोबर घेण्याची फारशी उत्सुकता नाही. त्यामुळे महायुतीतील शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांना आपले वर्चस्व दाखविण्यासाठी निवडणुकीत यश संपादन करावे लागेल. त्यासाठी अन्य पक्षातील अनआयारामांना प्रवेश देण्यासाठी डावपेच आखले जात आहेत.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com