Vikhe and Pawar: ''शरद पवारांनी एकदा गर्व से कहो, हम मराठा है, असे म्हणावे''; मंत्री विखेंनी दिलं आव्हान!

Sharad Pawar and Modi : शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या इशाऱ्यावर मंत्री विखे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Radhakrishna Vikhe and Sharad Pawar
Radhakrishna Vikhe and Sharad Pawarsarakarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जातीवरून राजकारण करू नये. नाहीतर जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, असा इशारा महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता.

शरद पवार यांच्या या इशाऱ्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांच्याच जातीचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टिपणी देखील मंत्री विखे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe and Sharad Pawar
Shrikant Shinde : ''2019 मध्ये स्वतःसाठी लोकांचा विश्वासघात केला, त्याचा बदला...'' ; श्रीकांत शिंदेंचा ठाकरे गटाला टोला!

नगर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज राज्याचे महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात एकमतने ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर झाल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या इशाऱ्यावर मंत्री विखे यांनी मोठे विधान केले.

मंत्री विखे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्या इशाऱ्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांच्याच(पवारांच्या) जातीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून त्याच्यावर चर्चा सुरू आहे. शरद पवार नेहमीच म्हणतात की मी स्वतः कधीही जातीचा राजकारण केलेले नाही. परंतु आमचा तोच आक्षेप आहे.

Radhakrishna Vikhe and Sharad Pawar
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंचा पुन्हा ठाकरेंना धक्का; आघाडी सरकारच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेला 'ब्रेक'

शरद पवार यांनी जाहीरपणे असे सांगावे की, गर्व से हम मराठा है! आम्ही ज्या घोषणा देतो, एक मराठा लाख मराठा, तशी घोषणा शरद पवार यांनी देऊन टाकावी. म्हणजेच त्यांच्या जाती विषयी असलेल्या चर्चेचा प्रश्न संपून जाईल, असेही मंत्री विखे म्हणाले.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com