Dombvali News : ''ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेला कधी नव्हे एवढे यश मिळाले आहे. महाविकास आघाडीला निम्म्यापेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. 2019 मध्ये स्वतःसाठी आपण(ठाकरे गट) लोकांचा विश्वासघात केला. त्याचा बदला म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना(ठाकरे गटाला) त्यांची जागा जनतेने दाखवली आहे.'' असे म्हणत कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पाचव्या नंबर वरून ते सातव्या नंबरवर गेले आहेत. ही वेळ का आली ? तर अडीच वर्षात जी कामे ते करू शकले नाहीत. ती कामे सव्वा वर्षात मुख्यमंत्री शिंदे यांनी करत जनतेला दाखवून दिली आहेत. असेही खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
कल्याण ग्रामीण भागातील कोणी गावात श्री दत्त नवनाथ मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेना शाखा कोणी आणि मोफत रुग्णवाहिकेचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी गोपाळ लांडगे, भरत भोईर, महेश गायकवाड, महेश पाटील, हनुमान ठोंबरे, राजेश मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करत आहोत. महाराष्ट्रात विविध विकास कामे जी सुरू आहेत ती सरकारच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जात आहोत. याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला आहे. ग्रामीण भागामध्ये शिवसेनेला कधी एवढे यश मिळालं नव्हतं. तेवढ यश हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मिळाल आहे. महाविकास आघाडीवरचा लोकांचा विश्वास पूर्णपणे गेलेला असून निम्म्यापेक्षा कमी जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत.
तर लोकांचा विश्वास महाविकास आघाडीवर राहिला नसून त्यावर या निवडणुकीत शिक्कामोर्तब करण्याचे काम सामान्य जनतेने केले आहे. हे का झाले तर मुख्यमंत्री शिंदे हे राज्यात विविध भागांमध्ये जाऊन तेथील समस्या सोडवण्यासाठी स्वतः उतरत आहेत. मुख्यमंत्र्यांवर लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि त्या वाढत्या विश्वासावरती शिक्कामोर्तब करण्याचं काम ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये झाले.
ठाकरे यांना टोला लगावताना खासदार शिंदे म्हणाले, ''स्वतःसाठी 2019 मध्ये लोकांचा विश्वासघात आपण केलात त्याचा बदला म्हणून लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवली. म्हणजे अपक्ष पेक्षा मागे सातव्या नंबर वरती तुम्हाला समाधान मानावे लागले. अगोदर पाचव्या नंबरवर होते आता सातव्या नंबर वरती गेले. त्यांचा शेवटून पहिला नंबर आलेला आहे.''
''अशी परिस्थिती का झाली कारण अडीच वर्षांमध्ये जे काम तुम्ही करू शकले नाही. ते काम सव्वा वर्षात शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिले आहे. एक ही दिवस न थांबता एकही दिवस न सुट्टी घेता काम करणारा मुख्यमंत्री कोण असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे लोकं काम करतो.'' असे ही श्रीकांत शिंदे म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.