Maratha Reservation News : 'त्यांनी सुरू केलेल्या चळवळीला संपवण्यासाठी तेच...' ; विखेंचं जरागेंना उद्देशून मोठं विधान!

Radhakrishna Vikhe on Manoj Jarnage News : 'कोणती भूमिका घ्यायची हा जरांगे पाटलांचा व्यक्तिगत प्रश्न आहे,' असंही राधाकृष्ण विखेंनी म्हटलं आहे.
Manoj Jarange, Radhakrishna Vikhe Patil
Manoj Jarange, Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला आंदोलन, उपोषणाच्या माध्यमातून जेरीस आणणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचं विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं.

यानुसार आता मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे. मात्र, जरांगे यांनी याबाबत सरकारवर फसवणुकीचा आरोप केला आहे. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण हवं असताना त्या पद्धतीने ते देण्यात आलं नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange, Radhakrishna Vikhe Patil
Manoj Jarange Patil News : 'देशाने पाहिलं नसेल असं आंदोलन...;' जरांगे पुन्हा सरकारच्या नाकीनऊ आणणार !

तर मनोज जरांगे यांनी घेतलेल्या या निर्णयावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय वर्तुळातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe) यांनी मनोज जरांगेंबाबत मोठं विधान केलं आहे.

'दोन्ही सभागृहाने एकमताने विधेयक मंजूर केलं आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण ही प्रमुख भूमिका आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. मराठा समाजाने आरक्षणाचे स्वागत केलं आहे. कोणती भूमिका घ्यायची हा जरांगे पाटलांचा व्यक्तिगत प्रश्न आहे,' असं राधाकृष्ण विखेंनी म्हटलं आहे.

याशिवाय 'सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिलं गेलं आहे. जरांगे पाटलांनी हट्ट सोडला पाहिजे. ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही. त्यांनी सुरू केलेल्या चळवळीला संपवण्यासाठी तेच कारणीभूत ठरतील. जनतेचा पाठिंबा त्यांना मिळणार नाही,' असं म्हणत राधाकृष्ण विखे यांनी सूचक विधान केलं आहे.

Manoj Jarange, Radhakrishna Vikhe Patil
Manoj Jarange : 'मराठ्यांची घरे उद्ध्वस्त करणारे जरांगे खोटारडे' निकटवर्तीयाचे खळबळजनक आरोप

"आता हा आपला शेवटचा मार्ग आहे, पण हे ताकदवान आंदोलन असणार आहे. देशाने बघितलं नसेल असं आपलं आंदोलन असणार आहे. कोणाची गाडी फोडायची नाही आणि जाळपोळ करायची नाही, पण मोठं आंदोलन करायचं आहे. ज्या स्वरूपाचं आरक्षण आम्हाला नको आहे, तशा पद्धतीचं आरक्षण सरकार आम्हाला देऊ पाहत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे. ओबीसीमधून (OBC) सरकारला आरक्षण देण्यात अडचण काय आहे? असा प्रश्नही जरांगेंनी विचारला.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com