Shirdi Nagarparishad election : मंत्री विखेंच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा 'निशाणा'; लोखंडेंची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात?

Sadashiv Lokhande Announces Seats for Shivsena in Rahta Shirdi : शिर्डी नगरपरिषदेत महायुतीमध्ये किती जागा लढवणार, याचा आकडा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सांगितला आहे.
Sadashiv Lokhande Announces
Sadashiv Lokhande AnnouncesSarkarnama
Published on
Updated on

Sadashiv Lokhande announcement : लोकसभेत पराभूत झालेले, विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांसाठी जोर लावला आहे.

भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ला असलेल्या शिर्डीत नगरपरिषदेत, महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 10 जागा मिळाव्यात, अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. सन्मानानं जागा मिळाल्या तर ठीक नाहीतर स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचेही सदाशिव लोखंडे यांनी म्हटले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील (Mahayuti) सर्वच मित्र पक्षांच्या स्वतंत्र बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. संगमनेरमध्ये सुजय विखे पाटील आणि अमोल खताळ यांनी बैठक घेतली. तर शिर्डी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

शिर्डी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या बैठकीत शिर्डी (Shirdi) नगरपरिषदेत 23 पैकी 10 जागांची मागणी केली. या जागा सन्मानाने मिळाल्या पाहिजेत, असा बैठकीत सूर अळवण्यात आला होता. अन्यथा शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवे,ल असा इशारा देण्यात आला आहे.

Sadashiv Lokhande Announces
BJP Sujay Vikhe : 'स्थानिक'साठी उमेदवारीचा निकष विखेंनी सांगितला; नेत्यांभोवती पिंगा घालणाऱ्यांच्या पोटात गोळाच आला

माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी कार्यकर्त्यांना संघटीत राहण्याचे आणि स्थानिक पातळीवर मतदारांशी संपर्क वाढवण्याचे आवाहन केले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची कोअर कमिटी लवकरच अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीचे प्रमुख नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन जागा वाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.

Sadashiv Lokhande Announces
Rohit Arya encounter : पोलिसांची हिरोगिरी, एन्काऊंटरच्या नावाखाली खूनच! रोहित आर्यप्रकरणावर वकील सातपुतेंचा खळबळजनक दावा

महायुतीत जागावाटपावरून तणाव वाढण्याची शक्यता असताना शिर्डीतील ही हालचाल आगामी निवडणुकीच्या समीकरणांवर परिणाम करू शकते. त्यामुळे शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीत सन्मानजनक जागा वाटप होते की, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाते, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी, शिर्डी नगरपरिषदेत ज्या प्रभागात आमची ताकद आहे, तिथं संधी मिळावी, अशी आमची मागणी आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील हे दोघेही आम्हाला अनकुल प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे. तथापि सन्मानजनक जागावाटप न झाल्यास माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पत्नी नंदाताई यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन सर्वशक्तीनीशी ही निवडणूक लढवण्याची आमची तयारी आहे, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com