

Mumbai lawyer serious allegations : मुंबईच्या पवई इथं 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर, अॅड. नितीन सातपुते यांनी खळबळजनक आरोप केले.
पोलिसांना हिरो व्हायचे होते. पोलिस अधीक्षक अमोल वाघमारे यांनाव हिरो व्हायचे होते. पायावर, हातावर गोळी मारून रोहितला जायबंदी करता आल असते. परंतु हिरोगिरीच्या नादात, थेट छातीवर गोळी चलावली. यातून सरकारला काय साध्य करायचे होते, हा खूनच आहे, असा गंभीर आरोप करत अॅड. नितीन सातपुते यांनी या एन्काऊंटरविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला.
अॅड. नितीन सातपुते यांनी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर (Encounter) गंभीर प्रश्न उपस्थित केल्याने यात सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसंच समाज माध्यमांवर देखील या एन्काऊंटवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे रोहित आर्य हा व्यवस्थेचा बळी आहे का? हा एन्काऊंटर भ्रष्ट राजकीय व्यवस्थेला वाचवण्यासाठी केला गेला का? असे प्रश्न केले जात आहेत. यातच अॅड. नितीन सातपुते यांनी या एन्काऊंटरप्रकरणी गंभीर मुद्दे उपस्थित केले आहे.
रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना पोलिस (Police) अधीक्षक दत्ता नलावडे हे रोहित आर्य याच्याशी बोलत होते. यातून पोलिसांना रोहित आर्य याची पार्श्वभूमी लक्षात आली असेल. हा प्रकार त्याने कोणत्या कारणातून केला, याची देखील पार्श्वभूमीची माहिती मिळाली असणार. असे असताना, पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क का साधला नाही? ते केसरकरांच्या संपर्कात होता, तर पोलिसांनी रोहित आर्य याला दीपक केसरकर यांच्याशी का बोलून दिले नाही? असा प्रश्न अॅड. नितीन सातपुत यांनी उपस्थित केला.
रोहित आर्य याला एन्काऊंटर करण्यापर्यंत मुंबई पोलिसांनी टोकाचं पाऊल का उचललं? रोहित आर्य याने मुलांना ओलीस ठेवले. पण ती परिस्थिती सरकारने निर्माण केली. ही परिस्थिती टाळता आली असती. रोहित आर्य याने त्याच्या सरकारी कामाचे पैसे मिळवण्यासाठी उपोषण केले. मात्र, सरकारने त्याला पैसे दिले नाहीत. रोहित आर्य हा दहशतवादी नव्हता, सरकारचीच कामं करत होता. मग तुम्ही त्याला वाचवले का नाही, असे अनेक मुद्दे अॅड. नितीन सातपुते यांनी उपस्थित करत रोहित आर्यच्या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
रोहित आर्य याच्या एन्काऊंटर करण्यात आला. त्यावेळी तो पिस्तूल बाळगून होता की नाही, याबाबत पोलिसांकडून कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिस अधीक्षक दत्ता नलावडे यांनी रोहित आर्य याच्याकडे गन होती की नाही, याचा तपास करू, असे म्हटले. त्याच्याकडे गन असली, तरी छऱ्याच्या बंदुकीने कोणाची हत्या होऊ शकत नाही. याकडे अॅड. नितीन सातपुते यांनी लक्ष वेधले.
पोलिसांना अशाप्रकारच्या परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. पोलिसांना गोळी मारायचीच होती, तर ती पायावर मारायला पाहिजे होती. पोलिसांकडून आम्ही पायावरच गोळी मारली होती. पण तो खाली वाकला अन् गोळी छातीत घुसली, असे दिलेले स्पष्टीकरण धादांत खोटं दिसते, असे अॅड. नितीन सातपुते यांनी म्हटले आहे.
पोलिस अधीक्षक अमोल वाघमारे यांना हिरो व्हायचं होतं, यातूनच त्यांनी एन्काऊंटरची घाई केली. पोलिसांनी ओलीस मुलांना सोडवलं ही कौतुकाची बाब आहे. पण रोहित आर्य काही सराईत गुन्हेगार नव्हता. हा एन्काऊंटर, म्हणजे खूनच आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा अॅड. नितीन सातपुते यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.