Beed Lok Sabha Constituency : बीड लोकसभेच्या उमेदवाराबाबत गोंधळ; युतीसह आघाडीत नेमकं काय सुरू?

Lok Sabha Election 2024 : मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढली असली तरी भाजपच येथून रिंगणात असणार आहे.
Beed Constituency
Beed ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : लोकसभा निवडणूक दोन महिन्यांवर आली असताना राज्यात जागावाटपाचा कल्लोळ कायम आहे. काही जागांबाबत निर्णय घेणे सोपे वाटत असतानाही तेथील तिढा सोडवणे म्हणजे युती आणि आघाडीसाठी डोकेदुखी ठरत आहे. यासाठी बीड लोकसभा मतदारसंघ हा उत्तम उदाहरण ठरत आहे. दरम्यान, भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडेंचे नाव पुढे येत असल्याने खासदार प्रीतम मुंडेंच्या (Pritam Munde) उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर आघाडीत येथून कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत निर्णय होताना दिसत नाही.

बीड जिल्ह्यात महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीची ताकद मोठी असली तरी ही जागा भाजपच लढवण्याचे निश्चित आहे. भाजपकडून पंकजा यांचे नाव पुढे येत असल्याने प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह आहे. तर आघाडीत ही जागा ज्येष्ठ नेते शरद पवारांकडे असून पक्षाचे अनेकजण इच्छुक आहेत. यातच मराठा समाजाकडूनही गावोगावी ‘मी उमेदवार, मी खासदार’चा नारा दिला जात आहे. परिणामी बीडच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या कल्लोळात आणखीच भर पडली आहे.

Beed Constituency
Ravindra Waykar In Shivsena : ठाकरेंचा आणखी एक ताकदवान आमदार फुटला? रवींद्र वायकर शिंदेंच्या गळाला?

राष्ट्रवादी काँग्रेसला 2004 सालचा अपवाद सोडला तर 1999 पासून ही लोकसभा जिंकता आली नाही. तर, 1996 पासून येथे भाजपची हुकूमत कायम आहे. यावेळी मतदारसंघात भाजपपेक्षा राष्ट्रवादीची ताकद वाढली असली तरी भाजपच येथून रिंगणात असणार आहे. असे असले तरी दोनवेळा विक्रमी मतांनी विजय मिळविणाऱ्या प्रीतम मुंडे यांचीही उमेदवारी धोक्यात आहे. बदलत्या राजकीय समिकरणामुळे त्यांच्या ज्येष्ठ भगिनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankja Munde) यांचेही नाव समोर येत आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Beed Constituency
Yusuf Pathan Lok Sabha 2024 Candidature : ममतांच्या टीमकडून 'बूम बूम पठाण' करणार 'बॅटिंग'; काँग्रेसच्या दिग्गज नेत्याविरुद्ध उमेदवारी!

महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार (Sharad Pawar) हाच पक्ष लढेल हे निश्चित आहे. पक्षातील जयसिंगराव गायकवाड, डॉ. नरेंद्र काळे, इश्वर मुंडे, प्रा. सुशिला मोराळे, गंगाभिषण थावरे आदींनी ‘मीच उमेदवार’ म्हणून जिल्हा दौरे सुरू केले आहेत. त्यामुळे या पक्षातही उमेदवार फायनल करताना पवारांचा कस लागणार आहे. पक्षात जिल्हाभरात वलय असलेला उमेदवार नसल्याने ही जागा काँग्रेसला सोडावी आणि खासदार रजनी पाटील किंवा माजी मंत्री अशोक पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान, महायुती व महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना (ठाकरे गट) या दोघांचे हाताची घडी आणि तोंडावर बोट, अशी गत आहे.

मराठा आंदोलकांच्या भूमिकेचा फायदा कुणाला?

मराठा समाजाला आरक्षण आंदोलनात जिल्हा कायम आघाडीवर राहिलेला आहे. आता ‘सगेसोयरे’च्या मागणीचा जोर आणि सरकारकडून आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. यामुळे आंदोलनातील अग्रभागी असणाऱ्यांनी ऐन लोकसभेत ‘मी उमेदवार, मी खासदार’ अशी घोषणा केली आहे. यासाठी तालुका आणि गावोगावी बैठका घेत उमेदवार उभे करण्याचे नियोजन केले जात आहे. यामुळे आयोगाकडून बॅलेट पेपरवर निवडणुकीचा पर्याय पुढे येऊ शकतो. उलट गुन्हे, आरक्षणाच्या मुद्द्याचा सरकारवर असलेला राग विरोधात जाण्यापेक्षा तो ‘मी उमेदवार, मी खासदार’ या स्वतंत्र गटाकडे जाणार आहे. तर, सत्तापक्षांची मते कायम राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जातात.

(Edited by Sunil Dhumal)

Beed Constituency
Latur Political News : अजित पवार गटाच्या संजय बनसोडे यांच्या कार्यक्रमात वाजली 'तुतारी'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com