

Rahul Gandhi Pune programme : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज कार्यक्रमापूर्वी पुण्यात काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) आणि भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात चांगलाच राडा झाला. COEP मध्ये शिष्यवृत्तीचा प्रश्न मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना 'ABVP'ने टार्गेट केल्याचा आरोप 'NSUI'ने केला. यावरून दोन्ही संघटनांमध्ये चांगलाच राडा झाला.
पोलिसांनी यावेळी बळाचा वापर करत युवा कार्यकर्त्यांना टार्गेट केल्याचा आरोप काँग्रेसने केला. विद्यार्थ्यांचा केलेला छळ अन् NSUIच्या जखमी कार्यकर्तांना पाहून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या जयश्री थोरात चांगलेच आक्रमक झाले.
पुण्यातील (Pune) COEP मध्ये शिष्यवृत्तीचा प्रश्न मांडणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न अत्यंत संतापजनक आहे, असे म्हणत या घटनेत जखमी झालेल्या युवक काँग्रेसच्या आनंद दुबे आणि रिहान बाबुडे यांची जयश्री थोरात यांनी भेट घेतली. तर आणखी एका कार्यकर्त्यावर संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे जयश्री यांनी सांगितले.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमानिमित्ताने महाराष्ट्रभरातील काँग्रेस नेते पुण्यात दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काँग्रेसने संपूर्ण ताकद लावली आहे. संगमनेरमधील काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या जयश्री थोरात हे देखील पुण्यात तळ ठोकून आहे.
या कार्यक्रमापूर्वी, काँग्रेसच्या 'NSUI' आणि भाजपच्या 'ABVP'मध्ये संघर्ष उफाळला आहे. यातून दोन्ही बाजूने राडा होऊन, काही कार्यकर्ते जखमी झाले आहे. यात सर्वाधिक काँग्रेसचे 'NSUI'चे युवा कार्यकर्ते जखमी झाले आहे. काँग्रेसने यावरून सत्ताधारी भाजपच्या 'ABVP'वर गुंडगिरीचा आणि पोलिस बळाचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
यावरून बाळासाहेब थोरात अन् जयश्री थोरात प्रचंड आक्रमक झाले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी, विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही.‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या समर्थनार्थ भूमिका मांडणाऱ्या एका युवतीला ABVP कार्यकर्त्यांनी डांबून ठेवणे आणि तिची सुटका करण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा घटनेचा निषेध केला.
विद्यार्थ्यांनी आपले मत मांडणे हा गुन्हा आहे का? असा कोणता गुन्हा केला की विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जातो? लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबून किंवा बळाचा वापर करून लोकशाहीचा आवाज बंद करता येणार नाही, असे थोरात यांनी कडक शब्दात सांगितले.
बाळासाहेब थोरात यांनी, पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची संचेती हॉस्पिटल येथे भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील! आवाज दाबता येईल, पण विचार दाबता येणार नाही, असे म्हटले.
काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडियाद्वारे COEP कॉलेजमधील काही विद्यार्थिनींनी माध्यमांमध्ये बाईट दिला होता की, कॉलेजमधून आम्हाला तीन वर्षांपासून स्कॉलरशीप मिळालेली नाही. हा मुद्दा आम्ही राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहोत. यानंतर ABVPच्या काही गुंडांनी या मुलींना धमकावले, त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला जावू नये यासाठी त्यांना डांबून ठेवले. तसेच हॉस्टेलमधून आणि कॉलेजमधून काढून टाकू, अशी धमकी त्या विद्यार्थिनींना दिल्याचा गंभीर आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.