Rahuri by-election vote counting : कर्डिले गटात अस्वस्थता? राष्ट्रवादी-वंचित निवांत; 'राहुरी'चा पहिला कल सकाळी 9 वाजेपर्यंत येणार...

Vote counting for Rahuri by-election with seven candidates will take place in 27 rounds, as per Ahilyanagar district administration planning : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या 27 फेऱ्याद्वारे होणार असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
Rahuri by-election vote counting
Rahuri by-election vote countingSarkarnama
Published on
Updated on

Rahuri assembly bypoll 2026 : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा अवघ्या काही तासांवर निकाल येऊन ठेपला आहे. मतमोजणीची निवडणूक अधिकाऱ्यांनी तयारी केली असून, 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. निकालाचा पहिला कल हा सकाळी नऊ वाजता येऊन, दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पोटनिवडणुकीतील विजयाचा ट्रक रेकाॅर्ड भारी असला, तरी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांचे कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत देखील कमी नाही, हे सांगताना आठवड्यापासूनच मतदारसंघात कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर झळकवले आहेत. वंचितचे संतोष चोळके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे काय करिश्मा दाखवतात, याकडे देखील लक्ष लागलं आहे. त्यामुळे मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राहुरी (Rahuri) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (By Election) मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. येत्या उद्या सोमवारी (ता. 4) मतमोजणी होणार आहे. टपाली मतमोजणीसाठी दोन टेबल, ईटीपीबीएसकरीता चार टेबल, ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीसाठी 14 टेबल आहेत. टपाली मतदान मोजणीपासून सुरुवात होईल. ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीच्या 27 फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी दिली.

राहुरी इथल्या लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सकाळी आठ वाजता टपाली मतदान मोजणीस सुरवात होईल. सकाळी साडेआठ वाजता ईव्हीएम मशीनच्या (EVM) मतमोजणीस सुरवात होईल. टपाली करिता दोन टेबल्ससाठी प्रत्येक टेबलवर एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, एक पर्यवेक्षक, दोन सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

Rahuri by-election vote counting
Govind Mokate Bypoll History : गोविंद मोकाटेंचा पोटनिवडणुकीतील विजयाचा 'ट्रॅक रेकॉर्ड भारी'; 'राहुरी'च्या निकालाची वाढली धडधड!

ईटीपीबीएस करिता (सेवा मतदारांच्या मतांची मोजणी) स्कॅनिंगसाठी चार टेबल्स आहेत. प्रत्येक टेबलवर एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. ईव्हीएम करिता दोन नायब तहसीलदार, 14 टेबल्ससाठी प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक, एक शिपाई असे अधिकारी व कर्मचारी मतमोजणीची प्रक्रिया करणार आहेत.

Rahuri by-election vote counting
Prajakt Tanpure Rahuri Bypoll Result : मतदानाचा घसरलेला टक्का, प्राजक्त तनपुरेंचा समर्थकांना 'तो' निरोप; निकालाआधीच राहुरीत 'धडधड' वाढली!

याशिवाय दोन अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त स्ट्राँगरूम करिता स्वतंत्र मनुष्यबळ व पथक नियुक्त करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात असणार आहे. त्यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल, राज्य राखीव दल व राज्य पोलिस दलाचे कर्मचारी तैनात असतील.

मतमोजणी कक्षामध्ये ओळखपत्राशिवाय कोणासही प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी दिले आहेत.मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास सक्त मनाई आहे. मतमोजणी केंद्रामध्ये कोणासही पेन आणण्यास मनाई आहे. मतमोजणी प्रतिनिधींना पेन पुरवले जाणार आहेत.

या पोटनिवडणुकीत सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. एकूण मतदार 3 लाख 33 हजार 545 एवढी होती. त्यात 1 लाख 86 हजार 405 मतदान झाले. या एकूण मतदानात 1 लाख 1 हजार 991 पुरूष, तर 84 हजार 414 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com