Rahuri Bypoll : राहुरी पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार का? संजय राऊत म्हणाले, 'आमच्याकडे तीन उमेदवार...'

MP Sanjay Raut reveals that three aspirants from Shiv Sena UBT are in the race for the Rahuri Assembly by-election : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून तीन उमेदवार इच्छुक असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
MP Sanjay Raut
MP Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena UBT candidates : राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल याची उत्सुकता आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेत, ऐकला चलो रे, अशी भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आजच्या मुंबईतील बैठकीत उमेदवारी निश्चित होईल, त्यानंतर महाविकास आघाडीतील चित्र स्पष्ट होईल. परंतु राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार का? या प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, भाजपचं नाव न घेता, खुमासदार प्रतिक्रिया देताना, महाविकास आघाडीत किती समन्वय यावर भाष्य केलं.

संजय राऊत म्हणाले, "राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा समन्वयाचा अभाव नाही. बारामतीमध्येही तशीच परिस्थिती आहे. राहुरी (Rahuri) आणि बारामती मधील दोन्हीही आमदारांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. या दोन्ही निवडणुका लढाईच्या का नाही याबाबत महाविकास आघाडी अंतर्गत चर्चा सुरू आहेत."

या दोन्ही निवडणुकी संदर्भात शरद पवार (Sharad Pawar) साहेबांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांबरोबर दूरध्वनीवरून चर्चा झालेली आहे. माहितीनुसार शरद पवार यांचा पक्ष आज राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यासंदर्भात बैठक होत आहे. जयंत पाटील आणि माझी देखील या निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

MP Sanjay Raut
Rahuri Bypoll Crisis : तनपुरेंच्या ‘एकला चलो’ने समीकरणं ढवळली; पवार राष्ट्रवादी-काँग्रेस-ठाकरे शिवसेना 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!

'काँग्रेस पक्षातील नेत्यांची देखील आमचा संवाद सुरू आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका थोडीशी कमी आहे. कारण की बारामती विधानसभा निवडणूक आम्ही लढलो नव्हतो. ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आहे. तसेच राहुरी विधानसभा निवडणूक देखील गेल्या वेळेस शरद पवार यांच्या पक्षाकडे होती. काय करायचं, हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

MP Sanjay Raut
Rahuri Bypoll : राहुरीत काँग्रेसचाच झेंडा? थोरातांच्या कॉन्फिडेंटने मविआत खळबळ!

राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून एकूण तिघे इच्छुक आहेत. राजकारणामध्ये निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते पुढे येत असतात. आमच्याकडे तिघे जरी इच्छुक असले, तरी राहुरी मध्ये महाविकास आघाडी म्हणून निर्णय व्हावा, अशी आमची इच्छा आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

पहिली संधी कोणाला?

प्राजक्त तनपुरे हे माजी आमदार आहेत, त्यांनी मागील निवडणूक शरद पवार यांच्या पक्षाकडून लढवलेली आहे. ते या वेळेस निवडणूक लढणार आहेत की नाही, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय होईल, अशी माझी माहिती आहे. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ.पहिली संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असेल, कारण की ती त्यांच्या वाट्याची जागा आहे. त्यानंतर काँग्रेस मतदारसंघात प्राबल्य आहे, त्यानंतर दुसरी संधी त्यांना असेल. आमच्याकडे तीन उमेदवार आहेत. पण ही निवडणूक होईल, असे ठामपण खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

राहुरी बिनविरोध नाहीच

खासदार संजय राऊत यांना माध्यमांचा प्रश्न असा होता की, राहुरी पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार का? या प्रश्नाला वरीलप्रमाणे प्रतिक्रिया देताना, संधीत भाजपचा कुठेच उल्लेख नाही. तसंच शेवटी ही निवडणूक होईल, अशी संजय राऊत यांनी भूमिका मांडून, भाजपविरोधात मविआचा उमेदवार असेल, असे संकेत दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com