Amit Thackeray Pune Lok Sabha : पुणे लोकसभेचा चेहरा 'राज'पुत्र ठरविणार ? मनसेच्या इच्छुकांची संख्या वाढली

Raj Thackeray : पुणे, बारामती, मावळ, शिरूर लोकसभेत मनसे नशीब आजमावणार; मात्र इच्छुकांची नावे मनसे अध्यक्षांना दिल्याची केवळ चर्चा
Amit Thackeray
Amit ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune MNS News : आता देशात सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्व लहान-मोठे पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करताना दिसत आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत जागांबाबत वाटाघाटी सुरू असतानाच मनसेही काही जागांवर आपले नशीब आजमावणार आहे.

यात पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या ठिकाणी मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तेथून अनेक इच्छुकांनी आपली नावे पक्षातील वरिष्ठांना कळवली आहेत. असे असले तरी पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंकडे जबाबदारी आहे. त्यामुळे पुणेचा उमेदवार अमित ठाकरेच ठरवतील, अशी चर्चा सुरू झाली.

Amit Thackeray
Beed LokSabha Constituency : शरद पवार गटातील डॉ. काळेंचा ‘बीडला हवा चेहरा नवा’चा नारा; निवडणुकीत बदल घडणार

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) अवघ्या काही महिन्यांवर आल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये उत्साह संचारला आहे. उमेदवारी मिळावी, यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने जोर लावण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा उमेदवाराचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असला तरी इच्छुक उमेदवारांच्या नावाच्या स्पर्धेत आपले नाव कायम रहावे, यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यात मनसेतील पदाधिकारीही मागे नाहीत.

Amit Thackeray
BMC Budget 2024-25 : मुख्यमंत्र्यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला चहल यांचा 80 कोटींचा 'बूस्टर डोस'

पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या काही जागांवर उमेदवार उभे करून लोकसभेला सामोरे जाण्याच्या तयारी मनसेने केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मनसे (MNS) पुणे लोकसभेसह, बारामती, मावळ, शिरूर या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत आहे. त्यासाठी मनसेत सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. तसेच मतदारांचा कल जाणून घेण्याचे कामही केले जात आहे. यात मनसेने एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात जास्त इंटरेस्ट दाखवला आहे.

Amit Thackeray
Teachers Transfers : गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांना सरकारने व्हॅलेंटाइन डे’चे दिले ‘हे’ बक्षीस !

पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. अमित यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आणि शहरातील नेत्यांनी उमेदवारांबाबत चर्चा केली. यापूर्वी मनसेकडून पुणे लोकसभेसाठी माजी शहराध्यक्ष वसंत मोरे, विद्यमान अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यात आता आणखी काही इच्छुकांच्या नावांची भर पडली.

Amit Thackeray
Actor Thalapathy Vijay News : सुपरस्टार थलापती विजयची राजकारणात एंट्री; लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा...

महापालिकेतील माजी गटनेते बाबू वागस्कर, किशोर शिंदे, गणेश सातपुते, माजी शहर अध्यक्ष हेमंत संभूस यांनी यांनीही इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी पक्षांच्या वरिष्ठांना पुण्यातून लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, पुणे लोकसभेसाठी पाच जणांची नावे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठविली असल्याची जोरदार चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत बाळासाहेब शेडगे म्हणाले, 'शहर पातळीवरून अशी कोणतीही नावे अद्याप पाठविण्यात आलेली नाहीत. जे कोणी इच्छुक आहेत, त्यांची नावे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माहीत असून अंतिम निर्णय तेच घेतील.' दरम्यान, पुण्याचे मनसे प्रभारी अमित ठाकरे (Amit Thackeray) असून उमेदवारीबाबत त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जाते. आता पुण्यातून मनसे कोणाला उमेदवारी देणार, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Amit Thackeray
BMC Politics : ठाकरेंसोबत ब्रेक-अप, शिंदेंसोबत पॅच-अप अन् चहलसाहेबांचा नवा गेट-अप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com