Raj Thackeray Today News : ठाकरेंचा नाशिकवर विश्वास; सलीम शेख नवे प्रदेश उपाध्यक्ष

Raj Thackeray Appointed Salim Shaikh Pradesh Upadhyaksh : राज ठाकरे यांनी नाशिकच्या शिलेदारावर दिली मोठी जबाबदारी...
Raj Thackeray News
Raj Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics News : महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शहरातील सर्व समाजघटकांमध्ये लोकप्रिय असलेले सलीम शेख यांच्यावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी नाशिकमधून नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील माजी गटनेते सलीम शेख यांची आज मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेख यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. Raj Thackeray Today News

Raj Thackeray News
Nashik Politics : बडगुजर यांनी शिंदे गटाचा डाव उलटविला अन्‌ भाजपच्याच अडचणी वाढल्या!

शेख हे सातपूर विभागातील मनसेचे माजी नगरसेवक आहेत. मनसेच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून ते सलग दोन वेळा नगरसेवक राहिले आहेत. सातपूरच्या कामगार वसाहतीत आणि सर्व समाजघटकांमध्ये मोठा जनसंपर्क असलेले आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या शेख यांना मनसेने आज नवी जबाबदारी दिली आहे. या नियुक्तीनंतर शेख यांनी राज ठाकरे यांचे आभार व्यक्त करून जबाबदारी सार्थ ठरवू, असे सांगितले.

राज्याच्या शहराच्या राजकारणात अतिशय वेगाने बदल होत आहेत. या बदलांमध्ये राजकारण आणि आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मनसे या सगळ्यांपासून अलिप्त राहून शहरासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. 2012 ते 2017 या कालावधीत नाशिक महापालिकेत मनसे सत्तेत होती. यावेळी राज ठाकरे यांनी केलेली कामे आजही जनतेला भावतात. 'सीएसआर' निधीच्या योजनेतून शहराचा विकास होऊ शकतो, ही संकल्पना सर्वप्रथम ठाकरे यांनी मांडली. नाशिक शहरांमध्ये ती यशस्वी करून दाखविली आहे. नंतरच्या सत्ताधाऱ्यांना ही विकासकामे आणि योजना पूर्ण करता आल्या नाही. झालेली विकासकामेदेखील ते सांभाळू शकले नाहीत. त्यामुळे नाशिक शहराला पुन्हा एकदा मनसे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाची गरज आहे, असे या शेख म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्तम समन्वय निर्माण करणार आहोत. त्यातून शहरातील मतदारांना एक चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी मनसेवर विश्वास टाकावा, असे आवाहन केले जाणार आहे. प्रत्येक घरापर्यंत मनसेचे धोरण आणि राज ठाकरे यांचे व्हिजन पोहोचवून आगामी महापालिका निवडणुकीत मनसे एक प्रबळ शक्ती म्हणून नाशिक शहरात उभी राहील, असा विश्वास शेख यांनी व्यक्त केला.

edited by sachin fulpagare

R...

Raj Thackeray News
Nashik Politics : छोटी भाभी अन् मोठी भाभी कोण? अंधारेंनी फरांदेंना डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com