Nashik Politics : छोटी भाभी अन् मोठी भाभी कोण? अंधारेंनी फरांदेंना डिवचलं

Sushma Andhare on Devyani Farande : भाजपच्या महिला आमदाराची कोंडी?
Sushma Andhare, Devyani Pharande
Sushma Andhare, Devyani PharandeSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकमधील एमडी ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त झाला तसे शिवसेनेच्या उपनेत्या (ठाकरे गट) सुषमा अंधारेंनी आपला मोर्चा नाशिककडे वळवला. छोटी भाभी अन् मोठी भाभी कोण? ललित पाटीलला कोणी पाठी घातले? ड्रग्ज प्रकरणात ललितच्या पाठीशी असलेल्यांवर कारवाई का होत नाही? असा आरोप करीत सुषमा अंधारे यांनी Nashik भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांना डिवचलं आहे. गतवेळी अगदी उसळून अंधारे यांच्यावर तुटून पडलेल्या फरांदे यांनी यावेळी मात्र दुर्लक्ष करीत वाद वाढणारच नाही, याची काळजी घेतली.

Sushma Andhare, Devyani Pharande
Jalgaon Politics : संतापलेल्या आंदोलकांनी महाजनांच्या कार्यालयाला ठोकले टाळे; मंत्र्यांना गावबंदीचा इशारा

पुणे येथील ससून रुग्णालयातून पसार झालेल्या ललित पाटील याचे एमडी ड्रग्ज प्रकरण राज्यभरात गाजले. पोलिसांनी एमडी ड्रग्ज बनवण्याचा अख्खा कारखाना समोर आणला आणि उद्ध्वस्त केला. मात्र, शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या ड्रग्ज व्यापारामुळे राजकारण तापले. ललित पाटील या पार्टीचा की त्या पक्षाचा याचे पुरावे समोर आणण्यात आले. त्यातच सुषमा अंधारे यांनी पोलिस आयुक्तांना एक पत्र दिले होते. तसेच पत्रकारपरिषदेमध्ये ‘छोटी भाभी’चे कनेक्शन समोर आणण्याची मागणी केली होती. कायदेशीर कोणताही आधार नसलेले ते पत्रच दोघींच्या वादाचे कारण ठरले होते.

सुषमा अंधारे यांची पत्रकारपरिषद संपल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी अंधारे यांच्याविरोधात थेट हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचे स्पष्ट केले होते. अंधारे यांनी मात्र मी फरांदे यांचे नावच घेतले नाही. त्यामुळे त्यांनी अंगावर का ओढून घेतले? असा प्रश्न उपस्थित करीत लढाई सुरू ठेवण्याचे संकेत दिले होते. याबाबत आमदार फरांदे यांनी ठेवलेला हक्कभंग प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दाखल करून घेतला. पण त्यानंतर अधिवेशनच संपले. पुढे कारवाई झाली नाही. तसेच या प्रकरणावरदेखील पडदा पडला. हा पडदा अंधारे यांनी शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनावेळी उघडण्याचा प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोण छोटी भाभी, कोण बडी भाभी, ललित पाटीलच्या पाठीराख्यांचे काय झाले? असे सवाल करीत अंधारे यांनी एकप्रकारे आमदार फरांदे यांना डिवचले. मात्र, यावेळी फरांदे यांनी या टीकेकडे दुर्लक्ष करीत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. फरांदे या भाजपच्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. दोन टर्म आमदार असलेल्या फरांदे यांची तिसऱ्या टर्मसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, ड्रग्ज प्रकरणानंतर पक्षातूनच देवयानी फरांदे यांच्या एकंदरीत कार्यशैलीबाबत नाराजीचे सूर आहेत. फरांदे यांची मुस्लिम समाजातील उठबस पक्षातील अनेकांना खुपत असल्याची चर्चा सुरू आहे.

edited by sachin fulpagare

R...

Sushma Andhare, Devyani Pharande
BJP Vs NCP : जळगाव जिल्ह्यात काँग्रेसनंतर राष्ट्रवादीला हादरा, 'हा' नेता भाजपच्या वाटेवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com