Nashik Politics : बडगुजर यांनी शिंदे गटाचा डाव उलटविला अन्‌ भाजपच्याच अडचणी वाढल्या!

Sudhakar Badgujar News : शिंदे गटाने ठाकरे गटावर टाकलेला डाव निष्फळ ठरल्याने नाशिक पश्चिममध्ये भाजपच्या अडचणी वाढणार...
Sudhakar Badgujar
Sudhakar BadgujarSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक शहरातील सर्वात मोठा व चार लाख असलेल्या मतदार असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कारवायांचा फटका विरोधकांऐवजी सहकारी पक्ष भाजपला बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर जोमात, तर भाजप कोमात अशी चिन्हे आहेत. (Badgujar's strategy increased BJP's problems in Nashik)

शिवसेनेत फूट पडल्यानंतर तयार झालेल्या एकनाथ शिंदे गटाने नाशिक शहराच्या व महापालिकेच्या राजकारणावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. या प्रत्येक डावपेचात उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी त्यांचा डाव उलटवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sudhakar Badgujar
Maratha Reservation : जरांगेंच्या आंदोलनाला मिळणार शाहिरी आवाज... कोल्हापूरचा चित्ररथ मुंबईकडे रवाना

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या महापालिका कामगार सेनेच्या कार्यालयाचा ताबा घेण्यापासून संघटनेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी शिंदे सेनेचे महानगरप्रमुख बंटी तिदमे यांच्या बाजूने सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागल्या होत्या. मात्र, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि माजी मंत्री बबन घोलप हे शिंदे गटाला भारी पडले. या राजकीय पराभवाने तोंड पोळलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांनी सावध व्हायला हवे होते. पुढचे डाव अधिक चाणाक्ष होऊन टाकायला हवे होते. मात्र तसे घडले नाही.

शिंदे गटाने मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित आरोपी सलीम कुत्ता याच्याशी बडगुजर यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी भाजप आमदार नीतेश राणे यांचा उपयोग करण्यात आला. त्यातही काहीही निष्पन्न न होता ते प्रकरण भाजपवर उलटविण्यात ठाकरे गट यशस्वी झाला. सध्या महापालिकेतील एसीबी चौकशीच्या प्रकरणातही बडगुजर यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या हाती फारसे काही लागले नाही.

Sudhakar Badgujar
Solapur News : शरद पवार गटाला सोलापूरमध्ये मोठा झटका; बड्या नेत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

शिंदे गटाच्या या कारवायांचा लाभ महायुतीला झाला नाही. उलट आता, त्याचा फटका नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या आमदार सीमा हिरे यांना बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या राजकीय कारवायांमध्ये त्याला सहकारी म्हणून भाजपचाही पाठिंबा होता, असा संदेश गेला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते बडगुजर यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली आहे.

बडगुजरदेखील राजकीयदृष्ट्या अधिक सावध झाल्याने ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अधिक जागरूकपणे डावपेच आखण्यात व्यस्त झाले आहेत. त्यामुळे एकंदरच शिंदे गटाच्या कारवाया 'खाया पिया कुछ नही, ग्लास तोडा 12 आणा' अशा पद्धतीच्या ठरल्या आहेत. करून गेली शिंदे सेना आणि भोगावे लागणार भाजपाला, असे नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये घडण्याची शक्यता आहे.

Edited By : Vijay Dudhale

R...

Sudhakar Badgujar
Gram Panchayat : उपसरपंच गब्बरचा गेम करण्यासाठी चक्क चार लाखांची सुपारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com