Nashik News : शिवसेना आणि मनसेची संयुक्त सभा नाशिकला झाली. या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विकास आणि मतदानातील गैरप्रकार याबाबत कठोर शब्दात विवेचन केले. पैसे घेऊन मतदान करणाऱ्यांना सावध करत भाजप, शिंदेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष मोठ्या प्रमाणावर पैशाचे वाटप करीत आहे. महिलांना लाडकी बहीण योजनेत दीड हजार दिले जातात. महागाईचा विचार करता हे पैसे किती दिवस टिकतात. साधे गॅसची सिलेंडर एक हजार रुपयाला आहे.
'
मतदानाला जाताना हे पैसे किती दिवस टिकणार? याचा विचार करावा. या प्रचाराला भुलून मतदान केले तर पुढचे पाच वर्ष तुमचे शहर संकटात येईल. मग पुढच्या पिढीला, मुलांना कोणत्या स्थितीत येणार आहात याचा जरूर विचार करा. ते भविष्यात म्हणतील माझ्या बाप विकला गेला. आईने पैसे घेतले. त्यामुळे हे वाट्याला आले.', असे राज ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले,'राज्यात ७० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. ते कोणत्या मार्गाने आले? दडपशाही, दहशत आणि पैसे वाटून माघारी घेण्यात आली. माघारीचा हा दर दहा-दहा कोटीपर्यंत गेला.हे पैसे कुठून आले? मतदारांचा मतदानाचा हक्क देखील सत्ताधारी सहन करू शकत नाहीत. कुठे नेऊन ठेवला आहे आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्र, याचा प्रत्येकाने विचार करावा.'
नाशिक महापालिकेत 2012 मध्ये मनसे सत्तेत होती. तेव्हा रतन टाटा यांच्यापासून तर महिंद्रा आणि कितीतरी उद्योगपती नाशिकला घेऊन आलो. या उद्योगपतींनी शहराच्या विकासात योगदान दिले. विविध प्रकल्प केले.
गोदा पार्क, बोटॅनिकल गार्डन, मुकणे धरण पाणीपुरवठा योजना, जीपीएस घंटागाड्या, कचरा प्रकल्प, चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क, बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय असे कितीतरी प्रकल्प उभारण्यात आले. सत्तेत आल्यावर भाजपने या सर्व प्रकल्पांची वाट लावली. एकही प्रकल्प सुरू ठेवला नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
पुढच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या भूलथापांना तुम्ही बळी पडले. गेल्या पाच वर्षात त्यांनी जाहीर केलेली कोणती कामे केली? एक तरी काम केले का? तुमची ही फसवणूक का झाली याचा विचार करा. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसेला सत्ता देऊन पहा. या शहराचा कायापालट नक्की करू, असे राज ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.