Sanjay Gaikwad Controversy : गुन्हा दाखल झाला तरी आमदार संजय गायकवाड काही सुधरेणात, आता अधिकाऱ्यांच्या आय बहीण...

Sanjay Gaikwad Abuses FDA Officials : आमदार गायकवाड यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी आपला फोन उचलत नसल्याचे सांगत त्यांना उद्देशून माध्यमांच्यासमोरच गलिच्छ शिवीगाळ केली.
Sanjay Gaikwad
Sanjay GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Gaikwad News: आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जेवण चांगले मिळाले नाही म्हणून कॅन्टीन चालकाला आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली. त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अखेर गुन्हा देखील दाखल झाला. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आमदार गायकवडा काही सुधारण्याचे नावच घेत नसल्याचे त्यांच्या दिसून येत आहे.

आमदार गायकवाड यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी आपला फोन उचलत नसल्याचे सांगत त्यांना उद्देशून माध्यमांच्यासमोरच गलिच्छ शिवीगाळ केली. आदिवासी मुलांना एका संस्थेत चांगले अन्न मिळत नसल्यावरून ते संतापले होते.

संजय गायकवाड म्हणाले, '*** फूड अॅण्ड ड्रग्जचे अधिकारी माझा फोन देखील घेत नाहीत. ते गेले सुद्धा नाहीत. जो संस्थाचालक आहे तो या आदिवसाची लेकरांच्या तोंडचा घास हिसकावतोय, त्यांना दूध देत नाही अंडी देत नाही. वरणच्या जागी तेथे फक्त वरणाचं पाणी असतं. प्रत्येक विद्यार्थ्यामागे 21 हजार रुपये यांना महिन्याला मिळतात. ७५ लाखांची ग्रँड मिळते. या संस्थाचालकाने येवढी हरामी का करावी.'

Sanjay Gaikwad
Ujjwal Nikam : उज्वल निकमांना राज्यसभेची लॉटरी; संतोष देशमुख हत्येची केस पाहणार का? नेमका कायदा काय सांगतो?

शिंदेंकडून गायकवाडांना समज?

संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समोर आली नव्हती. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय गायकवडा यांच्या कृतीमुळे शिंदे संतप्त झाले असून त्यांनी गायकवाड यांना समज दिली आहे.

Sanjay Gaikwad
Raj Thackrey Politics: राज, उद्धव ठाकरे युतीबाबतच्या अनिश्चिततेवर मनसेच्या नाशिक अधिवेशनात तरी होणार का फैसला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com