Varun Gandhi, Rahul gandhi
Varun Gandhi, Rahul gandhiSarkarnama

Rahul Gandhi - Varun Gandhi Meets : राहुल आणि वरुण गांधींच्या भेटीने राजकीय तर्कवितर्कांना उधाण

Rahul Gandhi Meets Varun Gandhi : राहुल गांधी आणि वरुण गांधी यांच्यातून विस्तवही जात नाही. अशातच दोन्ही भावांची केदारनाथमध्ये भेट झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
Published on

Delhi News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांचे चुलत बंधू वरुण गांधी यांनी मंगळवारी केदारनाथ मंदिरात दर्शनानंतर थोडक्यात चर्चा केली. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दोन्ही भावांमध्ये अशा प्रकारे सार्वजनिक भेट ही फारशी दिसून आलेली नाही.

Varun Gandhi, Rahul gandhi
Bharat Jodo Yatra: राहुल गांधी पुन्हा 'भारत जोडो यात्रा' काढणार ? काँग्रेसने आखला मोठा 'प्लॅन'

देशातील प्रमुख राजकीय घराण्यातून असलेल्या दोन्ही चुलत भावांच्या या भेटीने वरुण गांधींच्या राजकीय भवितव्यावरून आता तर्कवितर्क लावले जात आहेत. संजय गांधी आणि मनेका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी हे अलीकडच्या काही काळापासून भाजपच्या प्रमुख बैठकांमध्ये दिसून आलेले नाहीत. अनेक मुद्द्यांवर त्यांची भूमिका ही भाजपच्या भूमिकेशी सुसंगत नाही आणि वेगळी आहे. वरुण गांधी हे उत्तर प्रदेशातील पिलिभीतचे खासदार आहेत.

गांधी घराण्यातील दोन्ही भाऊ केदारनाथ मंदिराच्या बाहेर भेटले. त्यांनी एकमेकांचं अभिवादन केलं. आणि दोघांमध्ये थोडा वेळ चर्चाही झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ही भेट 'अतिशय छोटी' होती. पण या भेटीत मोठा दोन्ही भावांमध्ये मोठा उत्साह दिसून आल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या भेटीदरम्यान वरुण गांधी यांच्या मुलीला भेटून राहुल गांधी अतिशय आनंदीत होते, असं सूत्रांनी म्हटलं आहे. गांधी घराण्यातील या दोन्ही चुलत भावांची भेट कधी होत नाही. पण त्यांचे संबंध चांगले आहेत. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. राहुल गांधी हे गेल्या तीन दिवसांपासून उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये आहेत, तर वरुण गांधी हे मंगळवारी आपल्या कुटुंबासोबत केदारनाथमध्ये दर्शनाला आले.

एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजप विरोधात आघाडी उघडली आहे. दुसरीकडे भाजपचे खासदार असलेले वरुण गांधी हे गेल्या काही काळापासून नाराज आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलन असो, की उत्तर प्रदेशातील स्थानिक मुद्दे, वरुण गांधी हे भाजपपासून वेगळी भूमिका घेत आहेत. भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमातही ते दिसत नाहीत. यामुळे लोकसभा निवडणुका पाहता वरुण गांधी काय भूमिका घेता याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Varun Gandhi, Rahul gandhi
Bihar Reservation: बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढणार ? मुख्यमंत्री नितीश कुमारांची मोठी घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com