Raj Thackrey Politics: नाशिकमध्ये मनेसेने केली शिवसेनेची परतफेड, राज आणि उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचा नवा अध्याय...

MNS and Shiv Sena Come Together in Nashik: मनसेचे पदाधिकारी १९ वर्षांनंतर पोहोचले शिवसेनेच्या कार्यालयात, दिल्या शुभेच्छा.
Raj Thackeray & Uddhav Thackeray
Raj Thackeray & Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Dinkar Patil News: महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे. या चर्चेचा सत्ताधारी महायुती सरकारने मोठा धसका घेतला आहे. हिंदी सक्तीचा अध्यादेश मागे घेऊन सरकारने त्याचा प्रत्यय दिला आहे.

पहिलीपासून हिंदी सक्तीचा विषय करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. बाबतचा अध्यादेश महायुती सरकारने नुकताच काढला होता. हा अध्यादेश म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी केलेला खटाटोप ठरला आहे. एक प्रकारे स्वतःच्याच पायावर महायुतीने कुऱ्हाड मारून घेतल्याचे चित्र रंगविण्यात येत आहे.

यानिमित्ताने मनसे आणि शिवसेनेला महाराष्ट्राच्या राजकारणात नवा सूर गवसला. या विरोधात ५ जुलैला राज ठाकरे यांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. राज्यातील सर्व विरोधी पक्ष आणि मराठी भाषा प्रेमी यामध्ये सहभागी होणार असे चित्र होते. राज्य सरकारला त्याचा धसका घ्यावा लागला.

Raj Thackeray & Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule Politics: चंद्रशेखर बावनकुळे यांनी डोळे वटारताच साक्रीचे भाजप बंडखोर शरण, नगराध्यक्षांची पडली विकेट!

राज्य शासनाने हिंदी सक्तीचा आदेश मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्याचा जल्लोष नाशिक शहरात शिवसेना कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणा आणि अध्यादेश पाडून करण्यात आला. निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही लावलेली हजेरी चर्चेचा विषय ठरली.

Raj Thackeray & Uddhav Thackeray
Nashik Politics : हिंदी सक्तीच्या माघारीनंतर ठाकरेसेनेचा विश्वास वाढला; आता पुढचं टार्गेट सिंहस्थ कुंभमेळा, विरोधकांना केलं मोठं आवाहन

त्यानंतर शिवसेना कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार आणि शहर प्रमुख सुदाम कोंबडे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मनसेची स्थापना २००६ मध्ये झाली. त्यानंतर मनसे आणि शिवसेना यांच्यात झालेली फारकत हा मोठा राजकीय वादाचा विषय होता.

गेली १९ वर्षे या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांचे तोंड पाहणे प्रसंत केले नव्हते. हिंदी सक्तीच्या निमित्ताने हे पदाधिकारी एकत्र येत त्यांच्यात मनोमिलन घडले. शिवसेनेचे शहर प्रमुख मामा राजवाडे, उपनेते सुनील बागुल, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी यांचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांना मनापासून आलिंगन देत त्यांचे स्वागत केले.

दोन आठवड्यांपूर्वी नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले होते. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव ठाकरे च्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

ठाकरे ब्रँड म्हणजेच महाराष्ट्र आणि हिंदुत्व असे फलक झळकले होते. मनसे आणि शिवसेनेच्या एकत्रिकरणाची ती पहिली प्रक्रिया नाशिकमध्ये घडली. त्याची पुनरावृत्ती शिवसेनेच्या कार्यालयात झालेल्या हिंदी सक्तीच्या अध्यादेश मागे घेण्याच्या कार्यक्रमाच्या जल्लोषातून झाली.

आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तसेच अन्य पक्षांतून सत्ताधारी महायुतीत प्रवेश करणाऱ्यांची गर्दी झाली आहे. अनेक नेते शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भाजप पक्षात जात आहेत. पक्षांतर करणाऱ्या या सर्व नेत्यांनी देखील मनसे शिवसेना एकत्रितरणाचा धक्का घेतला आहे. नाशिक मध्ये या दोन्ही पक्षांतील मैत्रीचे नवे पर्व जोरात सुरू झाल्याची चर्चा या निमित्ताने आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com