MIM Vs Somaiya News: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सध्या राज्यभर दौरे करीत आहेत. बांगलादेशी नागरिक हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. त्यासाठी ते निवडक आमदारांना लक्ष्य करीत आहेत. मालेगावबाबत ते विशेष आग्रही आहेत.
मालेगाव शहरातील जन्मदाखल्यांची सध्या एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. यामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालकांसह विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकामार्फत सध्या घरोघर जाऊन मालेगाव शहरात जन्म दाखल्यांची तपासणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर मालेगाव शहराचे आमदार मौलाना मुक्ती इस्माईल यांनी त्यांचे शहरातील विरोधक माजी आमदार असिफ शेख आणि भाजपचे किरीट सोमय्या यांना फटकारले आहे. सोमय्या यांनी मालेगाव शहरावर आरोप करून या शहराची प्रतिमा डागाळली आहे. येत्या विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही या प्रश्नावर सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.
आमदार मुक्ती म्हणाले, यासंदर्भात सोमय्या यांनी तीन वेळा बैठक घेतली आहे. मुंबईत पंचतारांकित हॉटेलला देखील बैठका झाल्या आहेत. त्यांनी मालेगाव शहर आणि येथील नागरिकांवर तथ्यहीन आरोप केले. मात्र ते पुरावा देऊ शकलेले नाही.
मालेगाव शहर हे अतिशय सुसंस्कृत शहर आहे. या शहराची एक प्रतिमा आहे. ही प्रतिमा आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आहोत. मात्र सोमय्या सातत्याने आपल्या राजकीय हेतूसाठी खोटे आरोप करीत आले आहेत.
मालेगाव शहरात दहा हजार बांगलादेशी राहतात असा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. आमचे त्यांना आव्हान आहे की, तुम्ही एक तरी बांगलादेशी नागरिक मालेगाव शहरात शोधून दाखवावा. कारण या शहरात एकही बांगलादेशी किंवा रोहिंग्या मुस्लिम रहात नाही.
भाजपचे किरीट सोमय्या यांना आरोप करायची सवय झाली असावी. आरोप केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही. मात्र ते आरोप करताना विसरतात की राज्य शासनाने तीन समित्या मालेगाव येथील बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी नेमले आहेत अतिरिक्त पोलीस महासंचालकांची समिती घरोघर जाऊन तपासणी करीत आहे.
अद्याप शहरात एकही बनावट जन्म दाखला सापडलेला नाही. एकही बांगलादेशी नागरिक सापडलेलं नाही. तरीही सोमय्या यांची आरोप करण्याची परंपरा थांबत नाही. त्यांना स्वतःच्याच सरकारवर विश्वास राहिलेला नाही की काय, असा प्रश्न आमदार मुक्ती इस्माईल यांनी केला.
माजी खासदार सोमय्या सातत्याने मालेगाव शहरावर वोट जिहाद असा आरोप करीत आहेत. मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक मालेगाव शहरात असल्याचा त्यांचा दावा आहे. या राजकीय हेतूसाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यावरून आता एमआयएम देखील सोमय्या यांच्या विरोधात उतरली आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.