Raj Thackrey News: राज ठाकरेंच्या सैनिकांचे कन्नडीगांना जशास तसे उत्तर, दिला हा इशारा...

Raj Thackrey; MNS followers aggressively replied on Kannad, Marathi dispute-कर्नाटकात एसटी बस चालकाला काळे असल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
MNS Agitation at Nashik
MNS Agitation at NashikSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील बस चालकाला कन्नड भाषा येत नाही. या कारणावरून दोन दिवसांपूर्वी काळे फासण्यात आले होते. याबाबत महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रतिक्रिया उमटले आहेत. विविध संघटनांनी त्याचा निषेध करीत आंदोलन केले आहे.

मराठी विरूद्ध कन्नड या वादावरून आता पुन्हा एकदा राजकारण पेटले आहे. कोल्हापुरात त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने कर्नाटकातील बसेस रोखल्या होत्या. आता राज्याच्या अन्य भागातही तशाच प्रतिक्रिया उमटत आहे.

MNS Agitation at Nashik
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन म्हणतात, 'देवाभाऊं'ची कृपा झाली तरच...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून आदेश आल्यास कन्नड भाषिकांना चांगलाच धडा शिकवला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. कन्नड भाषिकांनी आताताईपणा करू नये, असा इशारा यावेळी देण्यात आला.

MNS Agitation at Nashik
Nilesh Lanke : नगरचा बिहार झालाय! अतिक्रमणाच्या कारवाईमागून सत्ताधाऱ्यांचं सूडबुद्धीचं राजकारण; खासदार लंके कडाडले

बेळगाव येथे कन्नड वेदिका रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला काळे फासले होते. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. अशाच प्रकारे मनसेने उत्तर देण्याचे ठरविल्यास कन्नड भाषिकांना ते महागात पडेल. यापुढे असा प्रकार घडल्यास तीव्र आंदोलन होईल. मनसे स्टाईलने होणारे हे आंदोलन कन्नड वेदिका संघटनेला झेपणार नाही, असा इशारा शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी दिला.

यावेळी नाशिक मध्यवर्ती बस स्थानकावर आलेल्या कर्नाटकाच्या बसेसला काळे फासण्यात आले. त्यावर जय महाराष्ट्र असे लिहिण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत कर्नाटक सरकार आणि कन्नड वेदिका संघटनेचा निषेध केला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, सत्यम खंडाळे, मिलिंद कांबळे, राकेश परदेशी, अमित गांगुर्डे, नितीन अहिरराव, जनार्दन खाडे, बबलू ठाकूर यांचा मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com