राज ठाकरे यांचा इतिहास फार कच्चा!

राज ठाकरे यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजेत.
Karan Gaikar
Karan GaikarSarkarnama

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thakrey) यांचा इतिहास फार कच्चा आहे. त्यांनी खुशाल राजकारण करावे पण इतिहासाला जोडून उगाच काहीतरी चुकीची उदाहरण देउन लोकांची माथी भड़कवू नये. त्यांच्या गोंधळलेल्या विधानांमुळे महाराष्ट्रातील युवकांची दिशाभूल होत आहे, अशी टिका छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर (Karan Gaikar) यांनी केली आहे.

Karan Gaikar
राज ठाकरेंना जास्त महत्व देऊ नका ; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

यासंदर्भात श्री. गायकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. ते म्हणाले, या आधीच राज ठाकरे यांनी एके ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांशी दगा करून शत्रुला जाउन मिळाले होते असे विधान केले होते. त्या विधानासंदर्भात त्यांनी या विधानाबाबतचा फोलपणा व चुक आजपर्यंत कधीच मान्य केलेली नाही.

Karan Gaikar
तुम्ही जल्लोषात मिरवणूक काढा...पोलिस परवानगीचे मी पाहतो!

ज्या विषयी आपला अभ्यास नाही त्यावर आपण का बोलता?. आज राज ठाकरे पुन्हा म्हणाले की, पुरंदरे यांच्यामुळे शिवाजी महाराज घरा घरात पोहोचले. याचा काय संबंध आहे? महात्मा फूले यांनी शिवजयंती सुरु केली. छत्रपती शिवरायांवर पहिला पोवाडा लिहिला व तो गायला. तेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म तरी झाला होता का?. छत्रपती शिवाजी महाराज इथल्या लोकांना पुरंदरेंनी सांगायला दोन, चार कादंबऱ्या आणि नाटक सोडल्यास पुरंदरेंचे कर्तुत्व काय? असा प्रश्न त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, अनेक ऐतिहासिक शस्त्र, ऐतिहासीक कागदपत्रे पुरंदरे यांनी गायब केलीत असा आरोप त्यांच्यावर आहे. ज्या माणसाने आयुष्यात एकही पोवाडा सादर केला नाही तो शिवशाहीर कसा झाला? राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा अपमान करण्याच्या दृष्टीने चुकीचा इतिहास सुद्धा ह्याच बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेनला सांगितला होता असेही आरोप त्यांच्यावर केले जातात. त्यामुळे राज ठाकरे आपण बोलताना जरा इतिहासाची माहिती घेऊन बोलावे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमुळे पुरंदरेंची ओळख आहे. पुरंदरेंमुळे छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नाही हे आपण का मान्य करत नाहीत?.

आज राज ठाकरे म्हणाले "शाहू फुले आंबेडकर यांच्या आधी हा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे" याचा नेमका अर्थ काय? डॉ. आंबेडकर, महात्मा फूले त्यांचे गुरु आहेत अस सांगतात. महात्मा फुले शिवाजी महाराजांना आपल गुरु मानतात आणि छत्रपती शाहू तर शिवाजी महाराजांचेच वंशज आहेत. त्यामुळे शिवराय आधीच येतात त्याआधी जिजाऊ सुद्धा येतात. राज ठाकरे यांनी खुशाल राजकारण हवे त्या मुद्यावर करावे मात्र इतिहासात हस्तक्षेप करून तो दूषित करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com