Rajabhau Waje : गुजरातच्या प्रवाशांनी ठाकरेंच्या खासदाराला घातले हे साकडे...

Gujarat Passengers Appeal to Thackeray MP : गुजरात आणि हरियाणाच्या प्रवासी संघटनांनी खासदार वाजे यांच्याकडे केली मागणी
MP Rajabhau Waje
MP Rajabhau Waje Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News: खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे रेल्वे संदर्भात विविध अडचणी मांडल्या जातात. खासदार वाजे यांनी देखील रेल्वेचे विविध प्रश्न संसदेत मांडले आहेत. आता त्यांच्याकडे वेगळीच मागणी आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्याला विशेष महत्व दिले जात आहे.

नाशिक शहरातून मोठ्या प्रमाणावर हरियाणा आणि गुजरातचे प्रवासी प्रवास करतात. या भागात मोठ्या प्रमाणावर या राज्यातील नागरिक स्थायिक झाले आहेत. विशेषता व्यवसायानिमित्त अनेकांनी नाशिकला रहाणे पसंत केले आहे. या रहिवासीयांनी आता एक नवी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे मागणी केली आहे.

MP Rajabhau Waje
Bhaskar Bhagre Politics: राष्ट्रवादीच्या खासदार भगरे यांनी फटकारले, "मिटकरींना काहीच काम धंदे नाहीत"

नाशिक वरून राजस्थानला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करावी, अशी मागणी हरियाणा, गुजरात प्रवासी संघाकडून शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने खासदार वाजे यांना निवेदन देण्यात आले. खासदार वाजे यांनी देखील या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न समजून घेतला.

MP Rajabhau Waje
Amit Shah Politics: ‘ व्होट जिहाद’च्या दिल्लीवारीला सुरतने लावला सुरूंग अन् गृहमंत्र्यांची मालेगावकडे पाठ!

नाशिक जिल्ह्यात मोठ्या संख्येने राजस्थानचे नागरिक राहतात. विविध भागात त्यांची वस्ती आहे. मात्र त्यांना गावी जाण्यासाठी सातत्याने अनेक अडचणी येतात. केंद्र शासनाशी संबंधीत या मागण्या आहेत.

नाशिक भागातूनही मोठ्या प्रमाणावर गुजरात आणि राजस्थान हरियाणा येथे पर्यटक जात असतात. या पर्यटकांचीही मोठी गैरसोय होते. विविध पर्यटन संस्थांकडून राजस्थानला आणि गुजरातला पर्यटनासाठी पसंती दिली जाते. विशेषत: नाशिक शहरातून मोठ्या संख्येने पर्यटक नियमितपणे राजस्थानला जातात. त्यामुळे नाशिकहून थेट राजस्थानला जाणारी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

येत्या दोन वर्षात नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. नाशिक हे सिंहस्थ नगरी असल्याने देशभरातून पर्यटक येथे येतात. विशेषतः विविध भाविकांना सिंहस्थ कुंभमेळा व अन्य कामांसाठी नाशिकला यावे लागते. यानिमित्ताने रेल्वे मंत्रालयाकडून राजस्थानला जोडणारी रेल्वे सुरू करण्याची मागणी सहज मान्य होण्यासारखी आहे.

धार्मिक पर्यटनासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जवळपास आठ लाख नागरिक या भागात राहत असल्याने नाशिक ते राजस्थान यादरम्यान रेल्वे प्रवासी गाडी सुरू करण्यास प्राधान्य द्यावे. अशी स्वतंत्र रेल्वे सुरू झाल्यास ती यशस्वी होईल असा दावा यावेळी करण्यात आला.

या निमित्ताने नाशिक आणि परिसरातील रेल्वेच्या विविध प्रश्नांना वाचा फुटली आहे. रेल्वे प्रवाशांचे असंख्य प्रश्न आहेत रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी सातत्याने मागणी होत असते. त्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातील रेल्वेच्या समस्यांनाही उजाळा मिळेल, हे मात्र नक्की.

राजस्थान प्रवासी संघाचे तेजपालसिंग लोढा, महेंद्रसिंग राजपूत, अनिल कौशिक, प्रेमसिंग राठोड, सज्जनसिंग राजपुरोहित आदींचा विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी अशी रेल्वे सुरू केल्यास त्याला मोठ्या प्रतिसाद मिळेल असा दावा देखील केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com